(Image Credit- freepressjournal)
दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता सर्वच राज्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी, लॉकडाऊनच्या नियमांचे पालन केले जावे यासाठी महाराष्ट्र पोलिस प्रशासन आणि सरकारनं चांगलीच कंबर कसली आहे. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात शहरात फिरायचं असेल तर आवश्यक कामांसाठी गाड्यांवर विविध रंगांचे स्टिकर लावण्याचं आवाहन मुंबईपोलिसांनी केलं आहे.
स्टिकरच्या रंगांबाबत लोकांमध्ये संभ्रम असल्यानं याबाबतचे अनेक प्रश्न मुंबई पोलिसांना विचारलं जात आहेत. त्यातील काही प्रश्न गंमतीशीर सुद्धा आहेत. तर अनेकांना अत्यावश्यक कारण नसताना बाहेर पडल्यास कोणतं स्टिकर लावायचं असा प्रश्न पडला आहे. ट्विटरच्या माध्यमातून असाच एक विचित्र प्रश्न विचारणाऱ्या मुंबईकरास पोलिसांनी तितकंच भन्नाट उत्तर दिलं आहे. पोलिसांचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियात व्हायरल झालं आहे.
सोशल मीडियावर हे ट्विट जोरदार व्हायरल होत आहे. अश्विन विनोद नावाच्या एका तरुणानं मुंबई पोलिसांना प्रेयसीला भेटण्याबद्दल प्रश्न विचारला होता. 'मला प्रेयसीला भेटायला जायचं आहे. , मला तिची आठवण येत आहे. त्यासाठी माझ्या वाहनावर कोणत्या रंगाचं स्टिकर लावावं लागेल,' अशी विचारणा त्यानं केली होती.
मुंबई पोलिसांनी या प्रश्नाला तितकंच मजेदार उत्तर दिलं आहे. 'प्रेयसीला भेटणं तुमच्यासाठी गरजेचं आहे हे आम्ही समजू शकतो. मात्र, दुर्दैवानं ही गोष्ट आमच्याकडील अत्यावश्यक सेवांच्या यादीत मोडत नाही,' असं पोलिसांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. बोंबला! वेटरनं भर मंडपात सासूच्या कपड्यांवर भाजी सांडली, आनंदाच्या भरात नवरीनं केलं असं काही.....
इतकंच नव्हे कोरोनाकाळात मुंबई पोलिसांनी संबंधित तरुणाला महत्त्वाचा संदेशही दिला आहे. 'अंतर ठेवल्यानं प्रेम वाढतं आणि सध्याच्या काळात तुमच्या आरोग्यासाठीही ते चांगलं आहे. हा केवळ एक टप्पा आहे. आपण संपूर्ण आयुष्य एकत्र घालवावं ही सदिच्छा,' असा भन्नाट रिप्लाय पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे लोकांनी या ट्विटवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. मला देवही पकडू शकत नाही तर पोलीस काय...', असं चॅलेंज देणाऱ्या 'खोपडी'ला पोलिसांनी दिलं होतं सडेतोड उत्तर...