नीरजने हाक मारली, पाकिस्तानच्या अर्शद नदीमने धावत येऊन तिरंग्यासोबत काढला फोटो (Video)
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 10:26 AM2023-08-28T10:26:33+5:302023-08-28T10:28:08+5:30
नीरज पोज देत असताना अर्शद बाजूला उभा होता, तेव्हा अचानक हा किस्सा घडला, पाहा VIDEO
Neeraj Chopra Arshad Nadeem, India Pakistan: भारतीय स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले. पोस्ट मॅच प्रेंझेटशनमध्ये तिरंगा फडकावल्यानंतर आणि राष्ट्रगीत गायल्यानंतर जल्लोष झाला. चोप्राने भारतासाठी ऐतिहासिक पहिले सुवर्णपदक जिंकले. दुसऱ्या संधीत 88.17 च्या फेकीसह त्याने स्पर्धेत दमदार प्रवेश केला. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 87.82 अंतरासह रौप्य पदक जिंकले, हे त्याच्या देशासाठी पहिले जागतिक अजिंक्यपद पदक ठरले. तर झेक प्रजासत्ताकच्या जाकुब वडल्जेने गेल्या वर्षी ओरेगॉनमध्ये 86.67 अंतरासह जिंकलेले कांस्यपदक कायम ठेवले. या दरम्यान, कॅमेरामनला पोज देताना नीरजने असे काही केले की त्याने संपूर्ण जगाची मने जिंकली. कट्टर विरोधक असलेल्या पाकिस्तानच्या रौप्यपदक विजेत्या खेळाडू अर्शद नदीमलाही त्याने व्यासपीठावर पोज देण्यासाठी बोलावले. दोघांनीही कॅमेऱ्यासमोर पोज दिली आणि सांगितले की, प्रयत्न केले तर प्रेम आणि मैत्रीचा संदेशही देता येईल.
सोशल मीडियावर या फोटोंचे कौतुक होत आहे. गमतीची गोष्ट म्हणजे नीरजच्या हातात तिरंगा होता, त्याने तो तिरंगा खांद्यावर घेऊन फोटो काढला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजच्या भाल्याला हात लावल्यामुळे अर्शद वादात सापडल्याचा हा क्षण साऱ्यांना लक्षात होता. पण नीरजने त्याला मोठ्या मनाने यावेळी बोलावले आणि दोघांनी एकत्र फोटो पोज दिली. बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक अथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरजने अभिमानाने भारतीय तिरंगा हातात धरलेला दिसला. हंगेरी येथे सुरू असलेल्या चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या नदीमने आपल्या भारतीय खेळाडूसोबतचा एक अप्रतिम क्षण शेअर केला. नदीमने देखील प्रतिस्पर्धाच्या ध्वजासोबत फोटो काढल्याने त्याचे कौतुक झाले.
Watch Neeraj Chopra inviting Silver medalist Arshad Nadeem (likely without flag) under Bharat's 🇮🇳 #AkhandBharatpic.twitter.com/Hy9OlgKpTE
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) August 28, 2023
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पोस्ट केले- आमच्या मुलतान स्टार अर्शद नदीमला सपोर्ट करा. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तू पाकिस्तानसाठी पहिले पदक विजेता ठरल्यामुळे आम्हाला तुझ्या प्रयत्नांचा अभिमान वाटतो. काही सोशल मीडिया युजर्सनी कॅमेऱ्यासमोर पोज देताना त्याने पाकिस्तानचा झेंडा का धरला नाही असा सवाल केला. पण त्यावरून फारसा वादंग झाला नाही.