सिडनीऑस्ट्रेलियात सिडनी येथे राहणाऱ्या क्लेमेटाईन ओल्डफिल्ड आणि अँथनी लॉट या नवदाम्पत्याने त्यांच्या पहिल्या बाळासाठी पुढील ६० वर्षांपर्यंत मोफत पिझ्झा खाता येईल इतकी रोखरक्कम एका स्पर्धेत जिंकली आहे.
ऑस्ट्रेलियातील एका सुप्रसिद्ध पिझ्झा कंपनीने एका अनोख्या स्पर्धेची घोषणा केली होती. ९ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत जे दाम्पत्य आपल्या नवजात बाळाचं नाव 'डॉमेनिक' किंवा 'डॉमिनिक' ठेवतील त्यांना १० हजार ८०० डॉलरचं पारितोषिक दिलं जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती. क्लेमेटाईन आणि अँथनी यांना नेमकं ९ डिसेंबर रोजी मध्यरात्री १.४७ वाजता पुत्ररत्नचा लाभ झाला. या दाम्पत्यानं आपल्या बाळाचं नाव 'डॉमेनिक' ठेवलं आणि स्पर्धा जिंकली. स्पर्धा सुरू झाल्याच्या २ तासांमध्येच क्लेमेटाईन यांनी स्पर्धेवर दावा ठोकला.
क्लेमेटाईनला आधीपासूनच 'डॉमेनिक' हे नाव आवडत होतं. तिनं अँथनीला सांगितलं असता त्यानंही त्यास होकार दिला. त्यांनी आपल्या मुलाचं नाव 'डॉमेनिक ज्युलियन लॉट' असं ठेवलं आहे.