130 च्या लाइनमध्ये 103 नंबर शोधण्याचं आहे चॅलेंज, 5 सेकंदाची आहे वेळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 01:21 PM2024-04-27T13:21:30+5:302024-04-27T13:22:12+5:30
Optical Illusion : वेगवेगळे पझल्स असलेले ऑप्टिकल इल्यूजन फोटो तर सगळ्यांनाच सॉल्व करणं आवडतं. कारण याद्वारे लोकांचं मनोरंजनही होतं आणि डोळ्यांची टेस्टही होते.
Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात. ज्यात ऑप्टिकल इल्यूजन फोटो किंवा व्हिडीओ सगळ्यांनाच आवडतात. कारण या फोटोंद्वारे मेंदुला चालना मिळते. तसेच डोळ्यांची टेस्टही होते. या फोटोंमध्ये एकतर काही गोष्टी शोधायच्या असतात किंवा काही चुका शोधायच्या असतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
वेगवेगळे पझल्स असलेले ऑप्टिकल इल्यूजन फोटो तर सगळ्यांनाच सॉल्व करणं आवडतं. कारण याद्वारे लोकांचं मनोरंजनही होतं आणि डोळ्यांची टेस्टही होते. असंच एक पझल सध्या व्हायरल झालं आहे. या फोटोत तुम्हाला 130 हा नंबर दिसत आहे ज्यात 103 हा नंबर हुशारीने लपवण्यात आला आहे. जो तुम्हाला शोधायचा आहे.
तुमच्याकडे हे पझल सॉल्व करण्यासाठी 5 सेकंदाची वेळ आहे. ज्यात तुम्हाला 130 या नंबरमध्ये 103 हा नंबर शोधायचा आहे. त्यासाठी तुम्हाला फोटो बारकाईने बघावा लागणार आहे. तेव्हा तुम्ही हे चॅलेंज पूर्ण करू शकता.
असे फोटो तुमच्या डोळ्यांसमोर आणि मेंदुसमोर भ्रम निर्माण करतात आणि मग तुम्ही कन्फ्यूज होता. यात लपलेला 103 हा नंबर शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण ठरलेल्या वेळेत हे पझल सॉल्व करणं काही सोपं काम नाही.
जर तुम्हाला 5 सेकंदामध्ये यातील 103 नंबर दिसला असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहे. पण जर अजूनही दिसला नसेल तर निराश होऊ नका. कारण तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही तो बघू शकता.