चाव्यांमध्ये लपवली आहे एक घंटी, जीनिअस असाल तर शोधून दाखवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 11:34 AM2024-04-30T11:34:48+5:302024-04-30T11:35:29+5:30
Optical Illusion : एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला काही चाव्या दिसत आहेत त्यात एक बेल म्हणजे घंटी लपवण्यात आली आहे. जी तुम्हाला 11 सेकंदात शोधायची आहे.
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन असलेले बरेच फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. हे फोटो मनोरंजनासोबतच तुमचा मेंदू आणि डोळ्यांची टेस्टही करतात. कुणी या फोटोतील रहस्य सहज उलगडतात तर कुणाला तासंतास वेळ लागतो. पण हे फोटो सॉल्व करणं इतकंही सोपं नसतं. कारण यात गोष्टी फारच हुशारीने लपवलेल्या असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला काही चाव्या दिसत आहेत त्यात एक बेल म्हणजे घंटी लपवण्यात आली आहे. जी तुम्हाला 11 सेकंदात शोधायची आहे.
मुळात या फोटोतील घंटी शोधणं काही सोपं काम नाही. कारण यात रंगांचा खास खेळ करण्यात आला आहे. त्यामुळे फोटो तुम्हाला फार बारकाईने बघावा लागणार आहे. तेव्हाच तुम्हाला यातील घंटी शोधण्यात यश मिळू शकतं. असाही दावा करण्यात आला आहे की, 100 पैकी केवळ तीन लोकच यातील घंटी शोधू शकतात. बाकी यात फेल होतात. चला तर मग तुम्हीही लागा कामाला कारण तुमच्याकडे केवळ 11 सेकंदाची वेळ आहे.
तुमच्यासमोर असलेल्या या फोटोत तुम्हाला घंटी सापडली का? जर अजूनही सापडली नसेल तर ती शोधण्यात आम्ही तुमची मदत करतोय. या फोटोत घंटी डाव्या बाजूला आहे. आता डाव्या बाजूला बारकाईने बघा आणि घंटी शोधा.
जर तुम्हाला यातील घंटी दिसली असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही सापडली नसेल तर निराश होऊ नका. कारण खालच्या फोटोत तुम्ही ती कुठे आहे हे बघू शकता.