Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच असे काही फोटो व्हायरल होत असतात जे मेंदू आणि डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. अशा फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन म्हटलं जातं. अशा फोटोंच्या माध्यमातून लोकांना वेगवेगळे क्विज आणि गेम्स खेळण्याची संधी मिळते. यातील काही फोटोंमध्ये तुम्हाला काही गोष्टी शोधयच्या असतात तर काहींमध्ये चुका शोधायच्या असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
तुमच्यासमोर जो फोटो आहे तो एका पार्कचा वाटत आहे. या पार्कमध्ये तुम्हाला एक वृद्ध व्यक्ती दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला काही झाडी आहेत आणि काही घरांचे छत दिसत आहेत. याच फोटोत लपला आहे एक कावळा. जो तुम्हाला 10 सेकंदात शोधायचा आहे.
जर तुम्ही यातील कावळा शोधला असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला यातील कावळा दिसला नसेल तर निराश होण्याची गरज नाही. कारण त्याला शोधण्यात आम्ही तुमची मदत करू.
फोटोत कावळा अगदी तुमच्या डोळ्यांसमोरच आहे. पण त्याला इतक्या हुशारीने लपवण्यात आलं आहे की, बरेच लोक त्याला शोधू शकलेले नाहीत. तुम्हाला अजूनही यातील कावळा दिसला नसेल तर उत्तर खालच्या फोटोत सर्कल केलं आहे.