फोटोत लपलेत ४ शब्द, १५ सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 11:45 AM2024-05-17T11:45:32+5:302024-05-17T11:48:46+5:30

सध्या तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये फक्त १५ सेकंदांमध्ये तुम्हाला ४ शब्द शोधून काढायचे आहेत.

optical illusion find the hidden 4 words in this picture in just 15 seconds | फोटोत लपलेत ४ शब्द, १५ सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

फोटोत लपलेत ४ शब्द, १५ सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजनसारखं चॅलेंज सोडवणं जितकं मजेदार वाटतं तितकंच ते कठीणही असतं. ऑप्टिकल इल्यूजनचे  फोटो अनेकदा तुमच्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. या फोटोंच्या माध्यमातून डोळे तसेच मेंदुचीही मोठी कसरत होते. ही खरंतर तुमची आणि तुमच्या डोळ्यांची परीक्षा ठरणार आहे. यावरून तुमचे डोळे किती तीक्ष्ण आहेत हे सुद्धा कळेल.आपल्या समोरच असलेली गोष्ट आपल्या दिसत नाही. ती गोष्ट तुम्हाला शोधावी लागते. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी आणला आहे. जाणून घेऊया काय आहे या फोटोमधील चॅलेंज. 

तुमच्यासमोर असणाऱ्या या फोटोमध्ये तुम्हाला  ४ शब्द शोधून काढण्याचं आव्हान आहे. हा एका लिव्हिंग रुमचा फोटो आहे. ज्यामध्ये  एक लहान मुलगा, मुलगी तसेच त्यांचा पाळीव कुत्रा दिसत आहे. पहिल्या नजरेत तुम्हाला एवढ्याचं गोष्टी दिसतील.पण, या फोटोत ४ शब्द  लपलेले आहेत जे तुम्हाला शोधायचे आहेत. ज्यासाठी फक्त १५ सेकंदाचा वेळ तुमच्याकडे असेल. चला तर मग... 

 

ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो नेहमीच आपल्यासमोर गोंधळ निर्माण करतात. एखादी गोष्ट आपल्या नजरे समोर असूनही ती आपल्याला दिसत नाही. त्या गोष्टीच तुम्हाला या चॅलेंजच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. समोर सगळ्याच गोष्टी एकसारख्या दिसू लागल्या तर त्यातून वेगळं काही तरी शोधणं हे मोठं जिकरीचं काम आहे. पण, प्रयत्न केला तर तुम्हीला नक्कीच याचं उत्तर सापडेल.

आम्ही असं गृहीत धरतो, की तुम्ही या फोटोमध्ये दडलेले ४ शब्द शोधण्यात यशस्वी झाला असाल. नसेल तर निराश होऊ नका. हे चार शब्द कुठे लपलेले आहेत ते आपण खालच्या फोटोमध्ये पाहूया. 

Web Title: optical illusion find the hidden 4 words in this picture in just 15 seconds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.