फोटोत 5 सेकंदात 580 नंबर शोधण्याचं आहे चॅलेंज, बघा तुम्हाला जमतं का!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 12:22 PM2024-05-09T12:22:02+5:302024-05-09T12:23:41+5:30
Optical Illusion : असा दावा केला जातो की, या फोटोतील 580 नंबर जास्तीत जास्त लोक शोधू शकले नाहीत. तुम्हाला 580 नंबर सापडला असेल तर तुम्ही जीनिअस आहात.
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो आजकाल लोकांना खूप आवडतात. कारण हे फोटो मेंदुची कसरत करतात आणि यांद्वारे टाइमपासही चांगला होतो. तुमचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोनही यातून समजून येतो. सोशल मीडियावरील वायफळ गोष्टी बघण्यापेक्षा हे फोटो किंवा पझल्स सॉल्व करणं कधीही चांगलं असं एक्सपर्ट सांगतात. कारण यातून तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहतं. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला 580 हा नंबर शोधायचा आहे.
फोटो तुम्ही बघाल तर सगळीकडे तुम्हाला 590 हा नंबर दिसत आहे. त्यात खूप हुशारीने 580 हा नंबर लपवण्यात आला आहे. जो तुम्हाला शोधायचा आहे. पण तो शोधणं काही सोपं काम नाही. अशा फोटोंमध्ये लपलेल्या गोष्टी लगेच सापडत नाहीत त्या शोधण्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण डोळे असायला हवेत. तसेच तुम्हाला मेहनती करावी लागते. या फोटोतील 580 हा नंबर शोधण्यासाठी तुमच्याकडे 5 सेकंदाची वेळ आहे.
असा दावा केला जातो की, या फोटोतील 580 नंबर जास्तीत जास्त लोक शोधू शकले नाहीत. तुम्हाला 580 नंबर सापडला असेल तर तुम्ही जीनिअस आहात. पण अजूनही सापडला नसेल तर निराश होऊ नका. तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तुम्ही उत्तर बघू शकता.