Optical Illusion Personality Test: आजकाल मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीआधी उमेदवारांची पर्सनॅलिटी चेक करण्याची पद्धत वाढली आहे. वेगवेगळ्या टेस्टच्या माध्यमातून उमेदवाराची बुद्धिमत्ता जाणून घेतली जाते. यातीलच एक ऑप्टिकल इल्यूजन टेस्ट. ज्यात उमेदवारांसमोर एक फोटो दाखवला जातो आणि त्यातील रहस्य त्यांना शोधायला किंवा भावना ओळखायला सांगितलं जातं.
अशाप्रकारचे फोटो दाखवून हे चेक जातं की, तुमची नजर किती तीक्ष्ण आहे आणि तुम्ही त्यात काय बघू शकत आहात. फोटो बघून जे उत्तर देता त्याद्वारे तुमची पर्सनॅलिटी आणि फिजिकल फिटनेसचा अंदाज घेतला जातो. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो बघितल्यावर काही लोकांना त्यातील झाडावर एक वाघ लटकलेला दिसत आला तर काही लोकांना फांद्या असलेलं झाड दिसलं. तुम्हाला या फोटोत काय दिसलं?
जर तुम्हाला सगळ्यात आधी या फोटोत वाघ दिसत असेल तर याचा अर्थ होतो की, तुम्ही आतून खूप मजबूत आहात. तुम्ही एकदा जर कोणता निर्णय घेतला तर त्यावर तुम्ही ठाम राहता. मग तो निर्णय बरोबर असो वा चुकीचा. तुम्ही कुणाचंही ऐकत नाहीत. याने तुमची पर्सनॅलिटी मजबूत असल्याचं समजतं.
शांत स्वभावाचे असतात असे लोक
जर तुम्हाला या फोटो झाड दिसलं असेल तर याचा अर्थ होतो की, तुमचा स्वभाव शांत आहे आणि तुम्हाला एकटं राहणं जास्त आवडतं. यातून हेही स्पष्ट होतं की, तुम्ही कोणतंही काम फार विचार करूनच करतात आणि ते करण्याआधी परिणामांबाबत नक्की विचार करता. हेच नाही तर तुम्ही कोणतंही पाउल उचलण्याआधी आपल्या मनाच्या आवाजावर पूर्ण विश्वास ठेवता.