तुम्ही अनेकदा पाहिलं असेल गावच्या ठिकाणी सिनेमा पाहण्यासाठी मोठ्या मैदानात स्क्रिन लावली जाते. रात्रीच्यावेळी पडद्यासमोर बसून लोक सिनेमा पाहण्याचा आनंद घेतात. सध्या सोशल मीडियावर सिनेमा पाहण्यासाठी केलेल्या जुगाडाचा असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही अवाक् व्हाल. तुमचा विश्वास बसणार नाही पण सिनेमा पाहण्यासाठी स्क्रिन म्हणून चक्क गाईला उभं केलं आहे आणि गाईच्या पोटावर सिनेमा पाहत आहेत.
आयपीएस अधिकारी दिपांसू काबरा यांनी हा ट्विटरवर हा फोटो शेअर करत गमतीदार कॅप्शन दिलं आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता लोक बसून गाईच्या पोटावर सिनेमा पाहत आहेत. गाईच्या पोटावर प्रोजेक्टर लावले आहे. हा व्हिडीओ कधीचा आहे, कुठला आहे. याबाबत माहिती मिळालेली नाही. आईपीएस दिपांसू यांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ आफ्रिकेचा असण्याची शक्यता आहे.
आईपीएस ऑफिसर दीपांशु काबरा यांनी या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की, सिनेमाचं वेड आणि देशी जुगाड यांची पराकाष्ठा आहे. देवा २०२० लवकर संपू दे. ही पोस्ट २४ डिसेंबरला शेअर करण्यात आली होती. आतापर्यंत ४०० जास्त लाईक्स आणि रिट्विट्स मिळाले आहेत. काही लोकांनी हा फोटो फारच गमतीदार असल्याचे म्हटलं आहे. लोकांनी या फोटोवर एकापेक्षा एक रिएक्शन्स दिल्या आहेत.
जखमी वासराला रुग्णालयात नेणाऱ्या हातगाडी मागे धावत होती गाय
ओडिशाच्या (Odisha) मलकनगिरी (Malkangiri) शहरातील एका गायीचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक झाले होते. वासराला घेऊन जात असताना त्याची आई म्हणजेच ती गाय हातगाडीच्या मागे धावताना दिसत आहे.
या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता जखमी वासराला दवाखान्यात नेण्यासाठी एका हातगाडीवर ठेवण्यात आलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना गाईबाबत खूप वाईट वाटत आहे. कारण आपल्या जखमी वासराला घेऊन जाताना एका हातगाडीच्या मागे ही गाय धावत आहे. गाईचा जीव आपल्या वासरासाठी कासावीस होत आहे. दोन व्यक्ती हातगाडीवरून या वासराला रुग्णालयात घेऊन जाताना दिसत आहेत. मात्र, या वासाराची आईदेखील त्यांच्या मागे धावताना दिसत आहे. सलाम! पदयात्रेदरम्यान तब्येत बिघडली; ५८ वर्षीय महिलेला पाठीवर घेऊन ६ किमी पायी चालला जवान
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वेगवान वाहनाच्या मध्ये आल्याने वासरु जखमी झाले होते. त्यानंतर लोकांनी याबाबत जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयात माहिती दिली होती. तसेच त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यु-ट्यूबवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ अजूनही व्हायरल होत आहे. शाब्बास! पुण्याच्या २ शाळकरी पोरींनी केली कमाल; मंगळ आणि गुरूच्यामध्ये शोधले ६ लहान ग्रह