सध्या सोशल मीडियावरपेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. अनेक राज्यात पेट्रोलचा भाव १०० रुपये प्रतीलीटर झालेला पाहायला मिळत आहे. आता हळूहळू डिझेलसुद्धा शंभरी गाठण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे. आधीच माहागाई यात पेट्रोल डिझेल महागलं तर सामान्य माणूस इंधनाचा एकही थेंब वाया जाऊ देणार नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बनवणाऱ्या माणसाला भविष्याची चिंता करून हसूसुद्धा येत आहे.
हा व्हिडीओ ट्विटर युजर @RJPandeY_ नं शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'एक बूंद तेल की किंत तुम क्या जानो रमेश बाबू.... ' सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ५ हजारापेक्षा जास्त लोकांनी पाहिलं असून ७०० पेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक माणूस कारमध्ये पेट्रोल भरून घेत आहे. पेट्रोलपंप कर्मचारी जसं ते नोझल बाहेर काढतो. तेव्हा तो माणूस त्याच्या हातातून नोझल हिसकावतो आणि नोझलमध्ये जराही पेट्रोल राहू नये यासाठी झटकतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी खूप गमतीदार कमेंट्स केल्या आहेत. भारीच! घराचं नाव 'इंडिओ', गल्लीचं 'विमानतळ'; पठ्ठ्यानं असं पूर्ण केलं आपलं स्वप्न, पाहा फोटो
सोशल मीडियावर लोक फनी व्हिडीओज, जोक्स शेअर करून आपलं दुःख मांडत आहे. पेट्रोलचे भाव वाढताच सोशल मीडियावर युजर्सनी मीम्सचा वर्षाव करायला सुरूवात केली होती. लोकांनी वेगवेगळ्या वाहनांना सायकलचे पार्ट्स जोडत पेट्रोलमुक्त वाहन तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. Flying dosa Video : लय भारी! मुंबई मॅनच्या 'Flying Dosa’ टेक्निकनं जगाला लावलं वेडं; पाहा जबरदस्त व्हिडीओ
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पेट्रोल आणि डिझेलच्या या दरवाढीवर आपले मौन सोडत, पूर्वीच्या सरकारांनी इंधन आयातीवरील निर्भरतेवर लक्ष दिले असते, तर आज मध्यम वर्गाला अशा कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला नसता, असे म्हटले होते.