बटाट्याचे चिप्स(Potato Chips) चांगले आहेत परंतु त्यात तुम्ही करी टाकून खराब का कराल? इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. सध्या इंटरनेटवर बटाट्याचे चिप्स करी(Potato Chips Curry)चा एक फोटो व्हायरल होत आहे. जो पाहून सोशल मीडियातील युजर्स वेगवेगळ्या रिएक्शन देत आहेत. बटाटा चिप्स करी ही अनोखी डीशचे फोटो कोलकाता फूड ट्रोटर्स(Kolkata Food Tortters) नावाच्या एका फेसबुक पोस्टवर अपलोड करण्यात आला होता.
हा फोटो तेव्हा व्हायरल झाला जेव्हा एका ट्विटर युजरने हा पोटैटो चिप्स करी पोस्टचा स्क्रीनशॉट्स कॅप्शनसह शेअर केला. त्यात लिहिलं होतं की, “हत्येच्या या कबुलीजबाबासाठी कमीत कमी १४ वर्षाचा कठोर कारावास” आपण या व्हायरल झालेल्या फोटोत पाहू शकता एका प्लेटमध्ये बटाट्याचे चिप्स तयार करण्यात आले आहेत. ज्यात भाज्यांऐवजी टॉमेटोपासून बनवण्यात आलेली ग्रेवीसारखा पदार्थ वापरण्यात आला आहे.
एका यूजरने डिशसाठी लिहिलंय की, मानवतेविरोधात हा गुन्हा आहे. तर दुसऱ्याने माणुसकीवर हल्ले होत आहेत असं म्हटलंय.
एका युजरने तर एकाच क्षणात भयानक आणि ह्दयस्पर्शी