बोंबला! पाईल्स झाल्याने कर्मचाऱ्याला हवी होती सुट्टी, मॅनेजरने मागितला पुरावा; पाठवला 'असा' फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 01:51 PM2024-10-28T13:51:14+5:302024-10-28T13:59:36+5:30

पाईल्सने पीडित एका व्यक्तीने जेव्हा ऑफिसमध्ये सुट्टी मागितली तेव्हा त्याला मॅनेजरने सुट्टी दिली नाही.

Piles patient wants sick leave boss wanted proof employees sent photo directly | बोंबला! पाईल्स झाल्याने कर्मचाऱ्याला हवी होती सुट्टी, मॅनेजरने मागितला पुरावा; पाठवला 'असा' फोटो!

बोंबला! पाईल्स झाल्याने कर्मचाऱ्याला हवी होती सुट्टी, मॅनेजरने मागितला पुरावा; पाठवला 'असा' फोटो!

Leave Application : पाईल्स ही एक अशी समस्या आहे जी आजकाल अनेकांना होते. ही समस्या झाल्यावर उठणं अन् बसणंही मुश्कील होऊन जातं. अशात बरेच लोक ऑफिसमध्ये न जाता घरीच आराम करतात. मात्र, पाईल्सने पीडित एका व्यक्तीने जेव्हा ऑफिसमध्ये सुट्टी मागितली तेव्हा त्याला मॅनेजरने सुट्टी दिली नाही. इतकंच नाही तर मॅनेजरने त्याला पाईल्स झाल्याचा पुरावा मागितला. अशात पाईल्सच्या त्रासाने वैतागलेल्या कर्मचाऱ्याने थेट त्याच्या गुदद्वाराचा फोटो काढून पाठवला.

गेल्या काही दिवसांपासून हा कर्मचारी पाईल्सच्या समस्येने हैराण होता. त्याला निटपणे उभंही राहता येत नव्हतं. अशात त्याने याबाबत त्याच्या ऑफिसमध्ये माहिती दिली आणि सुट्टीसाठी अर्जही केला. पण ऑफिसमधील मॅनेजरला सुट्टी देण्याआधी त्याची शारीरिक स्थिती जाणून घ्यायची होती. पण व्यक्तीला समजलंच नाही की, काय पुरावा द्यावा. अशात त्याने थेट गुदद्वाराचा फोटो काढला आणि ऑफिसमध्ये पाठवला.
या प्रकार जेव्हा समोर आला तेव्हा एकच गोंधळ उडाला. पाईल्सच्या समस्येने पीडित ही व्यक्ती जेव्हा या गोंधळातून बाहेर पडली तेव्हा त्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या.

या व्यक्तीने दावा केला की, याआधीही असं झालं होतं. अशात त्याला सुट्टी हवी होती. सुट्टी त्याच्यासाठी इतकी आवश्यक होती की, त्याने थेट असे फोटो पाठवले. पण आता त्याला भीती वाटत आहे की, या फोटोमुळे तो अडचणीत येऊ शकतो. त्याने रेडिटवर पोस्ट शेअर करून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, फोटोवरून त्याच्यावर काय अॅक्शन होऊ शकते.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यावर लगेच व्हायरल झाली. लोकांनी यावर भरभरून कमेंट्स केल्या. काही लोकांनी व्यक्तीचं समर्थन केलं तर काहींनी त्याची खिल्ली उडवली.

Web Title: Piles patient wants sick leave boss wanted proof employees sent photo directly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.