आजकाल सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.अशाच एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होत असून यामध्ये दोन वृद्ध महिला जुन्या चित्रपटाच्या गाण्यावर आनंदाने डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप लोकांनी लाईक केले आहे. तसेच व्हिडीओ खूप वेगाने व्हायरल होत आहे.
या महिलांच्या डान्सचा मजेशीर व्हिडीओ @Peechetodekho नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या १५ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये दोन महिला डान्स करतात आणि त्यांच्या डान्सचा आनंद युजर्संना खूपच आवडला आहे. युजर्स तो व्हिडीओ रिशेअर करत आहेत.
१९७१ साली आशा भोसले यांचे 'पिया तू अब तो आजा ...' हे गाणे हिट झाले होते. या गाण्याला अनेक लोकांनाही खूप पसंती दर्शविली होती. 'पिया तू अब तो आजा ...' या गाण्यावर दोन वयस्कर महिला रस्त्याच्या मध्यभागी जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ २९ ऑगस्टला ट्विटरवर शेअर करण्यात आला होता. त्यानंतर या व्हिडीओला आतापर्यंत २३ हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे. याशिवाय, या डान्सला आतापर्यंत हजाराहून अधिक लाईक्स आणि २०० हून अधिक रिट्विट केले आहे. वयस्कर महिलांच्या डान्सचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. त्यावर लोकांनी काही मजेशीर कमेंट सुद्धा केली आहे.
वयस्कर महिलांच्या या डान्समध्ये एक व्यक्ती सुद्धा सहभाग घेताना दिसत आहे. मात्र, तो लगेचच त्यांच्यापासून लांब झाला. कारवां चित्रपटातील 'पिया तू अब तो आजा ...' हे हिट गाणे अभिनेत्री हेलनवर चित्रित करण्यात आले होते. या गाण्याला आर. डी. बर्मन यांनी संगीत दिले होते.
आणखी बातम्या...
- सरकारी साक्षीदार होण्यास सिद्धार्थ, दिपेशची तयारी? नवे वळण येण्याची शक्यता
- आश्चर्यकारक! क्वारंटाइन सेंटरमध्ये ५८० रुपयांना खरेदी केले एक किलो टोमॅटो
- 'या' फोटोने आनंद महिंद्रांचे जिंकले मन; नितीन गडकरींना केली विनंती अन् म्हणाले...
- काय असतात VIP फोन नंबर्स? लाखो रुपयांना विकले जातात...
- धक्कादायक! आजीनं कर्ज फेडण्यासाठी एक महिन्याच्या नातीला १ लाख रुपयांना विकलं
- अॅपल कंपनी लवकरच आणणार स्वत:चे ‘Search Engine’, गुगलला देणार टक्कर
- कोरोना स्पेशल विमा सुरक्षा कवच लोकप्रिय, १५ लाखांहून अधिक लोकांनी घेतला फायदा
- Railway Recruitment 2020 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय ४३२ जागा भरणार
- CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...