ट्विटरने सध्या एक सर्वेक्षण केले होते. त्यात भारतातील "cleanest" promoter च्या यादीत रतन टाटांनी सगळ्यांना मागे टाकत स्वतःचे नाव अव्वल ठेवले आहे. ऑनलाईन बुलिंग म्हणजेच सोशल मीडियावरील गुंडगिरी विरुद्ध आवाज उठवल्यामुळे रतन टाटांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या पोस्टमध्ये , ऑनलाइन समुदाय एकमेकांसाठी हानिकारक होत आहे आणि एकमेकांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहे, असे रतन टाटा यांनी म्हटले आहे.
"हे वर्ष कोणत्या-ना-कोणत्या स्तरावर प्रत्येकासाठी आव्हानांनी भरलेले आहे. ऑनलाइन समुदाय एकमेकांसाठी हानिकारक होत असल्याचे दिसून येत आहे. लोक लगेच प्रतिक्रिया देऊन एकमेकांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहेत," असे रतन टाटा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. याचबरोबर, रतन टाटा म्हणाले, "माझ्या मते, यावर्षी विशेषत: आपण सर्वांनी ऐक्य आणि मदत करणे आवश्यक आहे आणि एकमेकांना कमी लेखण्याची ही वेळ नाही."
याशिवाय, एकमेकांच्या प्रति अधिक संवेदनशीलतेचा आग्रह करत अधिक दयाळूपणा, अधिक समज आणि धैर्याची आवश्यकता असल्याचे रतन टाटा यांनी पुन्हा एकदा सांगितले. ते म्हणाले, "माझी ऑनलाइन उपस्थिती मर्यादित आहे, परंतु मला आशा आहे की, हे प्रामाणिकपणाचे स्थान म्हणून विकसित होईल आणि द्वेष आणि गुंडगिरीऐवजी याठिकाणी प्रत्येकाला समर्थन मिळेल."
सोशल मीडियावर लोकांनी रतन टाटांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने 'अ मॅन विथ गोल्डन बूट' अशा शब्दात रतन टाटांचे कौतुक केले आहे. तसंच ऑनलाईन बुलिंग विरूद्ध आवाज उठवल्यामुळे लोकांनी आभार मानले आहेत. तर मयांक राजपूत या युजरने ''सर, तुम्ही ग्रेट आहात'' असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
खतरनाक! वाघाला घरात शिरताना पाहून लोकांचा थरकाप उडाला; अन् मग...., पाहा व्हिडीओ
ही दोस्ती तुटायची नाय! मधमाश्यांचा भन्नाट मित्र पाहिलात का?; Video पाहून हैराण व्हाल