Ravi Shastri : मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी घेतली कोरोना लस अन् डोळे बघताच नेटिझन्सनी केलं ट्रोल....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 01:48 PM2021-03-02T13:48:39+5:302021-03-02T14:09:34+5:30

Team India coach Ravi Shastri got the first dose of COVID-19 vaccine : १ मार्चपासून कोरोना लसीकरणाच्या (corona vaccination) दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. रवी शास्त्री यांनीही आज कोरोनाची लस घेतली. फोटो पाहताच रवी शास्त्री यांना नेटिझन्सनी ट्रोल केलं आहे.

Ravi Shastri: India head coach ravi shastri receives covid-19 vaccine first dose troll after shared photo | Ravi Shastri : मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी घेतली कोरोना लस अन् डोळे बघताच नेटिझन्सनी केलं ट्रोल....

Ravi Shastri : मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी घेतली कोरोना लस अन् डोळे बघताच नेटिझन्सनी केलं ट्रोल....

Next

१ मार्चपासून कोरोना लसीकरणाच्या (corona vaccination) दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. नरेंद्र मोदी यांनी  सोमवारी सकाळी नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. यानंतर नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेलाही कोरोनाची लस घेण्याचे आवाहन केले होते. दरम्यान रवी शास्त्री यांनी मंगळवारी ही लस घेतली आणि त्यांनी फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. हा फोटो चांगलाच चर्चेत आला आहे. लसीमुळे नाही तर रवी शास्त्री यांच्या डोळ्यांमुळे. 

इंटरनेटवर रवी शास्त्री यांच्या फोटोसह अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.  ''ये आखे कभी झूट नही बोलती'' असं म्हणत त्यांच्या डोळ्यांवरून ट्रोल केलं आहे. या फोटोजमध्ये तुम्ही पाहू शकता रवी शास्त्री यांचे डोळे काहीसे थकलेल्या अवस्थेत दिसत आहेत. यामुळेच नेटिझन्सनी त्यांची खिल्ली उडवली आहे. 

या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की, ''आज कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. या व्हायरसशी लढण्यात भारतातील वैद्यकिय कर्मचारी आणि वैज्ञानिकांनी जे कार्य केले, त्यानं जगभरात देशाची मान आणखी उंचावली गेली. या सर्वांचे आभार मानतो.''  बोंबला! आणखी तीन तरूणींसोबत सुरू होतं अफेअर, गर्लफ्रेन्डला समजलं तर तिने असा शिकवला धडा!



सोशल मीडियावर रवि शास्त्रींचा लस घेतानाचा फोटो तुफान व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. बाबो! हे आहेत भारतातले सगळ्यात श्रीमंत ५ भिकारी; करोडोंची संपत्ती अन् काय काय आहे जाणून घ्या

Web Title: Ravi Shastri: India head coach ravi shastri receives covid-19 vaccine first dose troll after shared photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.