Fishes were hungry duck feed them: वाह, भूकेलेल्या माश्यांना पाहून बदकानं चोचीतलं अन्न खाऊ घातलं; व्हिडीओ पाहून IAS अधिकारी म्हणाले.....
By manali.bagul | Published: March 4, 2021 05:40 PM2021-03-04T17:40:27+5:302021-03-04T18:16:13+5:30
Trending Viral News in Marathi : ३० सेकंदाच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता बदक कशा पद्धतीनं माश्यांना अन्न देण्यासाठी धडपड करत आहे.
सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो व्हिडीओ नक्कीच तुमचं मन जिंकेल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक बदक माश्यांना अन्न खाऊ घालत आहे. ज्या पद्धतीनं भुकेलेल्या माश्यांना तो अन्न खाऊ घालत आहे, ते पाहून नेटिझन्स आनंदी झाले आहेत. त्यांनी या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे. यातून चांगले कर्म करण्यासाठी प्रेरणासुद्धा मिळत आहे.
Sharing is Caring.❤️ pic.twitter.com/p8ORVIGfHd
— Awanish Sharan (@AwanishSharan) February 28, 2021
हा व्हिडीओ सोशल मीडियावर आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडीओच्या कॅप्शमध्ये लिहिले आहे की, , ‘शेयरिंग इज केयरिंग. ३० सेकंदाच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता बदक कशा पद्धतीनं माश्यांना अन्न देण्यासाठी धडपड करत आहे. दोन- तीन माशे एकाचवेळी बदकाच्या चोचीतून दाणे खात आहेत. या व्हिडीओनं सगळ्यांनाच आकर्षित होत आहे. गोलमाल हैं भई! आधी चोरीची कार विकली, पुन्हा चोरी केली तिच कार; CCTV मुळे भांडाफोड...
हा व्हिडिओ आतापर्यंत 86 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडल्यामुळे बर्याच कमेंट्स येत आहेत. १० हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक मानवतेचे उदाहरण असल्याचे म्हणत आहेत. मानवतेचं उदाहरण दाखवणारा असा व्हिडीओ तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. कॉम्प्युटर गेम खेळून केली छप्परफाड कमाई, ८ वर्षाचा मुलगा झाला २४ लाख रूपयांचा मालक