Social Viral : हल्ली गावाकडे किंवा शहराच्या ठिकाणी यात्रांचे सत्र सुरु झाले आहे. अगदी मोठ्या उत्साहाने, आनंदाने लोक यात्रेमध्ये सहभागी होताना दिसतात. शिवाय या यात्रेमध्ये लोकांची झुंबड पाहायला मिळते. आकर्षक रोषणाईने सजलेले आकाश पाळणे या यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरतात. लहानग्यांपासून ते मोठ्यांना आकाश पाळण्यात बसण्याचा मोह आवरत नाही. बरं मग, तुम्हीही यात्रेत गेल्यानंतर आकाश पाळण्यात बसला असालच ना? पण सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्ही यापुढे आकाश पाळण्यात बसण्याआधी हजारदा विचार कराल.
आजच्या घडीला आधुनिक तंत्राज्ञानावर आधारित अनेक उपकरणे विकसित झाली आहेत. आकाश पाळण्यासारखी नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने माणसाला सहज अवकाश भरारीचे सुख अनुभवता येते. पण या तंत्रज्ञानाचे जितके फायदे आहेत तितकेच तोटे देखील आहेत. अशावेळी सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे.
पाहा व्हिडीओ-
सोशल मीडियावर सध्या आकाश पाळण्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. हा व्हायरल व्हिडीओ चीनधील असल्याचे सांगण्यात येत आहे. चीनमधील एका पार्कमध्ये मोठ्या संख्येने लोक आकाश पाळण्यात बसून आनंद घेताना दिसत आहेत. अचानक हा पाळणा काही तांत्रिक अडचणींमुळे बंद पडतो. पण पाळण्यात बसलेले लोक अक्षरश: पाळण्यात बसून लटकत आहेत. काळजाचा थरकाप उडवणारा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हायरल व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे. अशा प्रकारच्या विजेवर चालणाऱ्या यंत्रामध्ये बसण्याआधी ते यंत्र चांगल्या अवस्थेत आहे की नाही हे पडताळणे गरजेचे आहे. अन्यथा अशी मजा जीवावरही बेतू शकते.