गायला सुरूवात करताच कुत्रा-मांजरांसह माणसांनी केलं असं काही; रेहमानने शेअर केला भन्नाट VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 01:04 PM2021-01-26T13:04:08+5:302021-01-26T13:08:24+5:30

या गायिकेनं सुर लावताच माणसांसह कुत्रा मांजरांनी दूर पळायला सुरूवात झाली आहे. 

Singer made such a teasing tune man ran away with dogs and cats in fear rehman shared funny video | गायला सुरूवात करताच कुत्रा-मांजरांसह माणसांनी केलं असं काही; रेहमानने शेअर केला भन्नाट VIDEO

गायला सुरूवात करताच कुत्रा-मांजरांसह माणसांनी केलं असं काही; रेहमानने शेअर केला भन्नाट VIDEO

Next

संगीत दिगदर्शक आणि गायक ए आर रेहमान नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. समाजात तसंच गॅमरच्या दुनियेत आपल्या कलाकारीमुळे त्यांनी एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावरही ए, आर रेहमान सक्रिय असल्याचे पाहायाला मिळतं. नुकताच त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पटाखा गुड्डी (Patakha Guddi)' गाण्याची गायिका ज्योति नूरां दिसत आहे. या गायिकेनं सुर लावताच माणसांसह कुत्रा मांजरांनी दूर पळायला सुरूवात झाली आहे. 

समोर आलेला व्हिडीओ एडिट केला असून  सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ज्योति नूरां (Jyoti Nooran Songh) वरचा सूर लावते. हा व्हिडीओ शेअर करीत रेहमानने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, हे कोणी एडिट केलं? रेहमानने शेअर केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. वाह रे नशीब! २० वर्षांपासून बिल्डींगमध्ये साफसफाई करायची; अन् एकेदिवशी घरच गिफ्ट मिळालं

ए आर रेहमान (AR Rahman) हे आपल्या जिवनाविषयी म्हणतात की, मी माझं आयुष्य स्वत: हँडल करू शकत नाही. हे नशीब आहे. लोकांचं कौतुक किंवा मग असं म्हणूया की ते मला पसंत करतात. ज्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे.''  हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया युजर्सना हसू आवरलं जात नाहीये. मजेशीर कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत. बापरे! डोक्यावर भलीमोठी बाईक घेतली अन् एका झटक्यात बसवर चढला; व्हिडीओ पाहून नेटिझन्स म्हणाले...

Web Title: Singer made such a teasing tune man ran away with dogs and cats in fear rehman shared funny video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.