पृथ्वी स्वत:भोवती फिरते हे माहीत असेलच, आता कशी फिरते याचा अद्भूत नजाराही बघा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 03:20 PM2024-11-30T15:20:00+5:302024-11-30T15:29:23+5:30
Viral Video : सोशल मीडियावर रोजच वेगवेगळे व्हिडीओ बघायला मिळतात. काही व्हिडीओ तर असे असतात ज्यांवर सहजपणे विश्वास बसत नाही.
Earth Spinning Video: पृथ्वी हा एक असा ग्रह आहे ज्याची चर्चा सतत वेगवेगळ्या गोष्टींसाठी होत असते. हा एकमेव असा ग्रह आहे ज्यावर जीवन आहे. पृथ्वीबाबत सतत नवनवीन आश्चर्यकारक गोष्टी समोर येत असतात. सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात २४ तास पृथ्वी स्वत:भोवती फिरताना दिसत आहे. हा अद्भुत नजारा पाहून लोक अवाक् झाले आहेत.
सोशल मीडियावर रोजच वेगवेगळे व्हिडीओ बघायला मिळतात. काही व्हिडीओ तर असे असतात ज्यांवर सहजपणे विश्वास बसत नाही. पृथ्वी स्वत:भोवती फिरते तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण आपण पृथ्वीवर राहूनही ते आपल्या जाणवत नाही. मात्र, ते बघण्याची संधी या व्हिडिओद्वारे मिळाली आहे. हा एक टाइमलॅप्स व्हिडीओ आहे. जो नामीबियाचे फोटोग्राफर Bartosz Wojczyńsk यानी रेकॉर्ड केला आहे. त्यांनी आकाशाला स्टॅबलाइज करून हा व्हिडिओ तयार केला.
फोटोग्राफर Bartosz Wojczyńsk यानी २४ तासात पृथ्वी फिरण्याचा हा अद्भुत व्हिडीओ शेअर केला आहे. यात तुम्ही दिवसापासून ते रात्रीपर्यंत पृथ्वी फिरताना दिसते. खास बाब म्हणजे या क्लीपमध्ये कॅमेरा आकाशाकडे स्टॅबलाइज करून ठेवण्यात आला होता. ज्यामुळे पृथ्वीचं फिरणं स्पष्टपणे रेकॉर्ड झालं.
The Earth's rotation visualized by stabilizing the sky over a 24 hour period, filmed in Namibia by photographer Bartosz Wojczyński.pic.twitter.com/YLtVdCtJMN
— Wonder of Science (@wonderofscience) November 16, 2024
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @wonderofscience नावाच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. याच्या कॅप्शनला हा व्हिडीओ कुणी रेकॉर्ड केला आणि कुठे केला हे सांगितलं आहे. आतापर्यंत या व्हिडिओला २ लाख २ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर लोकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.