'या' सुंदर आणि आलिशान रूममध्ये आहे काहीतरी 'विचित्र', तुम्ही ओळखू शकता का?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 04:30 PM2019-08-06T16:30:57+5:302019-08-06T16:39:24+5:30
सुंदर आणि आकर्षक घर प्रत्येकाचच स्वप्न असतं. अनेक लोक त्यांच्या स्वप्नातील घर तयार करतात आणि ते सजवतात. कोणतही घर हे दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून तयार केलं जातं.
सुंदर आणि आकर्षक घर प्रत्येकाचच स्वप्न असतं. अनेक लोक त्यांच्या स्वप्नातील घर तयार करतात आणि ते सजवतात. कोणतही घर हे दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून तयार केलं जातं. एक म्हणजे सुरक्षा आणि दुसरी म्हणजे प्रायव्हसी. सध्या सोशल मीडियात एक फोटो व्हायरल झाला असून यात एक सुंदर घर दिसत आहे. पण या फोटो काहीतरी विचित्र आहे. त्यामुळे लोक या फोटोकडे शंकेच्या नजरेने बघत आहेत.
बारकाईने बघा लक्षात येईल...
Ensuites without walls. The owner of this Wynnum house knocked them down and he says it's what couples want. What do you think? #housesforsalepic.twitter.com/2EylnZKHzp
— Debra (@Debrabela81) June 14, 2019
हा फोटो ट्विटरवर @Debrabela81 नावाच्या यूजरने पोस्ट केला आहे. डेब्रा एक रिअल इस्टेट रिपोर्टर आहे. या फोटोच्या माध्यमातून ती लोकांचं एका खास गोष्टी लक्ष वेधू पाहतो आहे. जर लक्ष देऊन जर हा फोटो पाहिला तर लक्षात येईल की, बेडरूमसोबतच बाथरूमही आहे. पण बेडरूम आणि बाथरूमच्या मधे भींत नाहीये. म्हणजे प्रायव्हसी अजिबात नाही.
It is absolutely not what most couples want. There are some things that should be sacred.
— Sami Dowd (@samidowd) June 15, 2019
डेब्रा लिहिते की, 'भिंती नसलेलं इनसुइट. घराच्या मालकाने मधली भींत काढली आहे. त्यांचं म्हणणं आहे की, आजकाल कपल्सना असेच घर हवे आहे'. या घराच्या मालकाचं नाव ट्रॉय विलियम्सन आहे. त्याने बेडरूम आणि बाथरूम असं करून घेतलं.
Ensuites without walls. The owner of this Wynnum house knocked them down and he says it's what couples want. What do you think? #housesforsalepic.twitter.com/2EylnZKHzp
— Debra (@Debrabela81) June 14, 2019
रिअल इस्टेट डॉट कॉमसोबत बोलताना विलियम्सनने सांगितले की, 'अनेक लोकांना माझ्यावर शंका होती. पण मला लोकांना हेच सांगायचं आहे की, आजकाल हाच ट्रेन्ड आहे. पती-पत्नीसाठी दोन वेगळे बेसिन, दोन शॉवर, मला ही रूम अशीच हवी होती'.
No way! Every marriage needs privacy!
— Julie Cadd (@juliemonry) June 14, 2019
💯 Sami
— Richard Callander (@richieplz) June 15, 2019
I love my wife but I don’t want to be laying in bed watching her have a 💩
Ridiculous
It might be the way for the trendsetters like @BlueBetDunc
असो, तर सध्या हा फोटो सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे. लोक हा फोटो पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत. या फोटोवर कमेंट करणाऱ्यांमध्ये विवाहित कपल्सही आहेत. त्यांनी लिहिले की, फोटोग्राफीसाठी अशा रूम चांगल्या वाटतात. पण राहण्यासाठी कठीण आहे. यात प्रायव्हसीसारखं काहीही नाही.