Man made royal enfield bullet : जबरदस्त! पठ्ठ्यानं लाकडापासून बनवली रॉयल एन्फिल्ड बुलेट; रियल बुलेटपेक्षा भारी लूक पाहून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 01:57 PM2021-03-16T13:57:17+5:302021-03-16T14:09:31+5:30

Man made royal enfield bullet : खऱ्याखुऱ्या बुलटेप्रमाणे अत्यंत  रूबाबदार आणि स्टालिश अशी ही  बुलेट दिसत आहे. ही बाईक पाहून  रिअल बुलेट एन्फील्ड असल्याचं तुम्हीही म्हणाल

Trending viral News : This kerala man made royal enfield bullet model from different woods | Man made royal enfield bullet : जबरदस्त! पठ्ठ्यानं लाकडापासून बनवली रॉयल एन्फिल्ड बुलेट; रियल बुलेटपेक्षा भारी लूक पाहून व्हाल अवाक्

Man made royal enfield bullet : जबरदस्त! पठ्ठ्यानं लाकडापासून बनवली रॉयल एन्फिल्ड बुलेट; रियल बुलेटपेक्षा भारी लूक पाहून व्हाल अवाक्

Next

बाईक लव्हरर्सचे बुलेट प्रेम किती घट्ट असते याची तुम्हाला कल्पना असेलच. सगळ्या बाईक्स  एका बाजूला आणि  बुलेट एका बाजूला. तरूणांमध्ये बुलेटचा इतका क्रेझ असतो की त्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते.  बुलेटवर बसण्याची मजाच काही वेगळी आहे. सोशल मीडियावर एका बुलेट प्रेमीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या माणसाचं बुलेटवर खूपच प्रेम होतं म्हणून त्यानं लाकडापासून बुलेट बनवली आहे. ही बुलेट पाहून तुमचेही डोळे उघडेच राहतील. कारण खऱ्याखुऱ्या बुलटेप्रमाणे अत्यंत  रूबाबदार आणि स्टालिश अशी ही  बुलेट दिसत आहे. ही बाईक पाहून  रिअल बुलेट एन्फील्ड (Royal Enfield) असल्याचं तुम्हीही म्हणाल.

केरळच्या रहिवासी असलेल्या जिदहीन करूलाई यांनी ही युनिक आणि सुंदर बाईक बनवली आहे. ही व्यक्ती इलेक्ट्रशियन आहे. जवळपास २ वर्षांपूर्वी या माणसानं लाकडापासून बुलेट बनवायला सुरूवात केली. आता ही बाईक पूर्णपणे बनून तयार झाल्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Viral : ऑनड्यूटी स्तनपान करत होती महिला पोलिस; फोटो व्हायरल होताच अधिकाऱ्यांनी मागितली माफी

वृत्तसंस्था एएनआयनं व्हिडीओ शेअर करत यासंबंधी अधिक माहिती दिली आहे. पहिल्यांदा पाहिल्यानंतर ही बाईक लाकडापासून बनवली आहे. यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. या कलाकारानं बुलेट तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या लाकडांचा वापर केला आहे.  बाईक्सचे टायर्स बनवण्यासाठी मलेशियाई लाकडांचा वापर केला असून पॅनल्ससाठी रोजवूड आणि टिकवूड या प्रकारच्या लाकडांचा वापर केला आहे.

 Video : कमाल! नियम मोडणाऱ्यांना लांबूनच असं ओळखतात ट्रॅफिक पोलिस; पाहा व्हायरल व्हिडीओ

याआधीही जिदहिन यांनी  लाकडापासून बाईक तयार केली होती. त्यावेळी त्यांनी बुलेटचं एक लहान मॉडेल बनवलं होतं. ही बाईक तयार केल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात होता. ज्यावेळी जिदहिन यांनी बुलेट घेतली होती तेव्हाच त्यांनी नवीन बुलेट बनवण्याचा विचार केला होता. 
 

Web Title: Trending viral News : This kerala man made royal enfield bullet model from different woods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.