Woman carry husband : ऐकावे ते नवलंच! ....म्हणून इथं पतीला पाठीवर बांधून धाव धाव धावतात महिला; कारण वाचून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 02:21 PM2021-03-12T14:21:12+5:302021-03-12T14:23:28+5:30
Trending Viral News in Marathi : या स्पर्धेत महिला आणि पुरूषांचा समावेश असतो. यातून महिला पुरूषांपेक्षा कमी नाहीत, असंच काहीसं सिद्ध होतं.
महिला आणि पुरूषांना समान दर्जा मिळावा दोन्ही समान आहेत. या मुद्द्यावर नेहमीच वाद विवाद होताना पाहायला मिळतात. भारतातच नाही तर जगभरातील प्रत्येक देशात या मुद्द्यावर वाद झालेले पाहायला मिळतात. पण नेपाळमध्ये वेगळ्याच पद्धतीनं या मुद्द्यावर बोललं जातं. यासाठी एका स्पर्धेचं आयोजन केलं जातं. या स्पर्धेत महिला आणि पुरूषांचा समावेश असतो. यातून महिला पुरूषांपेक्षा कमी नाहीत, असंच काहीसं सिद्ध होतं.
Interesting Race: Running Competition carrying husband on the back at Devghat Rural Municipality on the occasion of International Women's Day.
— Routine of Nepal banda (@RONBupdates) March 8, 2021
Pic:Devghat Rural Municipality Office pic.twitter.com/4iONKJviml
इंडिया टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी नेपाळच्या देवघाट परिसरात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महिलांनी आपल्या पतीला पाठीवर घेत पळण्याचा प्रयत्न केला. समानता आणि जागरूकता वाढवण्यासाठी पतीला पाठीला बांधून धावण्याच्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. या १०० मीटर मॅराथॉनमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील १६ जोडप्यांनी भाग घेतला होती. त्यातील एका महिलेनं सांगितले की, 'मी खूप साहस आणि निष्ठेनं इथे आली आहे. मी आतापर्यंत जिंकू शकलेली नाही पण महिलांची प्राथमिकता आमि सन्मान हा माझ्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे. '' आग लागलेल्या जंगलात अचानक बसरल्या पावसाच्या सरी; आनंदाच्या भरात महिला पोलिसानं धरला ठेका; पाहा व्हिडीओ
नेपाळची राजधानी काठमांडूपासून १५० किलोमीटर अंतरावर या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. ही शर्यंत पाहण्यासाठी लांबून लांबून लोक आले होते. दुर्गा बहादुर थापा (Durga Bahadur Thapa) या शर्यतीचे आयोजक होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या शर्यतीमागचं कारण स्त्री पुरूषांना समान वागणूक मिळणं हेच आहे. या शर्यतीत सहभागी असलेल्या स्पर्धकांना कोणतंही बक्षिस दिलं जात नाही. फक्त एक प्रमाणपत्र दिलं जातं. काय सांगता? २९ हजार लिटर दारू उंदरांनी संपवली; पोलिसांचा दावा वाचून तुम्हीही व्हाल अवाक्....