बाबो! ट्रक, टॅम्पो नाही तर कारमध्ये गाईला घेऊन प्रवासाला निघाला पठ्ठ्या; व्हिडीओ पाहून लोक म्हणाले....
By Manali.bagul | Published: March 1, 2021 03:24 PM2021-03-01T15:24:33+5:302021-03-01T15:38:32+5:30
Viral News of Man Carried Cow In Car : हा हसून हसून लोट पोट व्हायला लावणार व्हिडीओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी शेअर केला आहे.
सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे. तुम्ही पाहिलेच असेल की गायीला दुसर्या ठिकाणी हलविण्यासाठी ट्रक, ट्रॉली किंवा रिक्षाचा वापर केला जातो. पण इथे मात्र या व्यक्तीने जुगाड करून गाईला गाडीत ठेवलं (Man Carried Cow In Car) आणि तो मागे लटकत होता. हा हसून हसून लोट पोट व्हायला लावणार व्हिडीओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी शेअर केला आहे.
अब तक का सबसे ‘सॉलिड’ जुगाड़.😅 pic.twitter.com/8C9phPmam0
— Awanish Sharan (@AwanishSharan) February 27, 2021
व्हिडिओमध्ये असे दिसते की ७ सीटर कारमध्ये गाय आहे. ती मान बाहेर काढून पाहात आहे. ती व्यक्ती कारच्या बाहेर उभी आहे आणि गाय सांभाळत आहे. मागच्या कारमध्ये बसलेल्या व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे.
हा व्हिडिओ २७ फेब्रुवारी रोजी ट्विटरवर शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत या व्हिडीओला 22 हजारांहून अधिक लोकांनी पाहिलं असून 2 हजारांपेक्षा अधिक लाईक्स आणि 200 हून अधिक री-ट्वीट आले आहेत. लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. व्हिडीओ शेअर करताना अवनीश शरण यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, आतापर्यंतचा सगळ्यात सॉलिड जुगाड.
घरातच पाळली बुटकी गाय, दिवसाला देते ५ लीटर दूध
याआधीही असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये गाईचं वासरू (Punganuru Baby Cow) आपल्या मालकासह खेळताना दिसून येत आहे. ५० सेंकंदाच्या या व्हिडीओमध्ये गाईला समोर उपस्थित असलेली माणसं प्रेमानं गोंजारत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ही गाय आजूबाजूला फिरत आहे. गाईचं वासरू जसजसं फिरत राहतं त्याचप्रमाणे गळ्यातील घंटासुद्धा वाजतो. तुम्हीसुद्धा व्हिडीओ पाहताना या गाईच्या प्रेमात पडाल. कारण छोटेसे, गिरागस गाईचे वासरू सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. बापरे! मच्छीमारांच्या जाळ्यात अडकली गरोदर शार्क; पोट फाडल्यानंतर जे बाहेर आलं ते पाहून बसला धक्का
Baby Punganuru cow at home. Punganuru cows are an endangered species. Very pretty to look at. They grow to a height of 3-4 ft & weigh 150-200 kgs. They give 4-5 Lts of high fat milk per day. @ParveenKaswan@IfsJagan@SudhaRamenIFS@Dept_of_AHD#SundayVideopic.twitter.com/DKGkWLKqvZ
— S. Rajiv Krishna (@RajivKrishnaS) February 14, 2021
ट्विटरवर सोशल मीडिया युजरनं दिलेल्या माहितीनुसार एका या गाईच्या वासराचे नाव पुंगनुरू आहे. गाईची ही प्रजात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या गाईची उंची ३-४ फूट असून वजन १५० चे २०० किलोग्राम आहे. ही गाय रोज ४ ते ५ लीटर हाय फॅट दूधसुद्धा देते. आतापर्यंत ७ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून ३८ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. हजारो लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ९० लाखांचा फ्लॅट घेऊन चोरीसाठी खणलं भुयार; डॉक्टरांच्या घरातून 'अशी' लंपास केली कोट्यांवधींची संपत्ती