संपूर्ण जगात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. भारतात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली असताना आता तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक ठिकाणी कठोर निर्बंध लागू आहेत. काही राज्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. शाळा, महाविद्यालयं कित्येक महिन्यांपासून बंद आहेत. परीक्षादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. याच कालावधीत सोशल मीडियावर अनेक व्हिडीओदेखील व्हायरल झाले आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं बंद आहेत. ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. बऱ्याच राज्यांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी खूष आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दोन चिमुरड्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 'कोरोनाविरुद्धच्या लढाईत आम्ही आमच्या शिक्षणाचं बलिदान देण्यास तयार आहोत,' असं ही दोन मुलं म्हणत आहेत. एका मुलानं तर कहरच केला आहे. पंतप्रधान मोदीजी, सात वर्षे शाळा बंद ठेवाव्या लागल्चा तरी लागल्या तरी आम्हाला कोणतीही अडचण नाही, असं एकानं म्हटलं आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओची जोरदार चर्चा आहे.
मोदीजी, आम्ही बलिदान देण्यास तयार; चिमुरड्यांचा धमाल व्हिडीओ पाहून आवरणार नाही हसू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2021 1:43 PM