Uber driver lost his job : अरेरे! बालाजीला जाऊन टक्कल करणं अंगाशी आलं; Uber नं थेट कामावरुनच काढलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 07:48 PM2021-04-02T19:48:20+5:302021-04-02T20:10:01+5:30

Uber driver lost his job : आयुष्यात सुख, समृद्धी यावी यासाठी त्यानं नुकतीच भगवान तिरुपती बालाजी देवस्थानला (Tirupati) भेट दिली आणि प्रथेनुसार आपले केस अर्पण केले. पण टक्कल केल्यावर असं काही होईल याची कल्पना त्याला नव्हती. 

Uber driver lost his job because of baldness read the reason | Uber driver lost his job : अरेरे! बालाजीला जाऊन टक्कल करणं अंगाशी आलं; Uber नं थेट कामावरुनच काढलं

Uber driver lost his job : अरेरे! बालाजीला जाऊन टक्कल करणं अंगाशी आलं; Uber नं थेट कामावरुनच काढलं

googlenewsNext

(Image Credit- India Today)

अनेक कंपन्यांमध्ये पेहरावाबद्दल तसच हेअरस्टाईल बद्दल नियम घालून दिलेले असतात.  काही ठिकाणी असे नियम मोडल्यानंतर कारवाई केली जाते. अशीच एक घटना सोशल मीडियावर समोर आली आहे. हैदराबादमधील (Hyderabad) एका उबर चालकानं  (Uber Driver) टक्कल केल्यामुळे नोकरी गमवावी लागली आहे. आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी यावी यासाठी त्यानं नुकतीच भगवान तिरुपती बालाजी देवस्थानला (Tirupati) भेट दिली आणि प्रथेनुसार आपले केस अर्पण केले. पण टक्कल केल्यावर असं काही होईल याची कल्पना त्याला नव्हती. 

तिरूपतीहून आल्यावर त्यानं उबरच्या पोर्टलवर लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा फेशियल रिक्ग्नेशन सिस्टीममध्ये (Facial Recognition App) त्याचा चेहरा ओळखला गेला नाही. त्यामुळं त्याचं लॉग इन नाकारलं गेलं. असं का होत आहे, हे न कळाल्यानं तो परत परत लॉग इन करत राहिला. त्यामुळं शेवटी सिस्टीमनं त्याला बॅनच केलं. परिणामी त्याला आपली नोकरी गमवावी लागली. श्रीकांत (Srikanth) असं या ड्रायव्हरचं नाव असून गेला महिनाभर तो नोकरीशिवाय आहे.

या प्रकरणानंतर चालकानं  उबर (Uber) कंपनीकडे तक्रार केली. आपला आधीचा आणि नंतरचा असा फोटो आणि आवश्यक कागदपत्रेही दिली. मात्र अद्याप कंपनीचा त्यावर कोणताही प्रतिसाद आला नसल्याचं त्यानं सांगितलं. श्रीकांत म्हणाला की,'' उबरच्या ऑफिसमध्ये मी खूपदा गेलो. पण नीट कारण न देताच त्यांनी मला नोकरीवरून काढून  टाकलं. महिना झाला माझ्या हातात काम नाही म्हणून मी बेरोजगार आहे. माझं संपूर्ण कुटुंब माझ्यावर अवलंबून आहे. आता त्यांची पोटं कशी भरायची हा माझ्यासमोरचा सगळयात मोठा प्रश्न आहे.''

विशेष म्हणजे  श्रीकांत गेल्या दोन वर्षां पासून उबरबरोबर काम करत होता. त्यानं 1428 फेऱ्या केल्या असून, त्याला त्याच्या चांगल्या सेवेसाठी 4.67 स्टार मिळाले आहेत. अॅप आधारीत वाहतूक सेवा देणाऱ्या कामगारांच्या महासंघाचे (Indian Federation of App Based Workers) महासचिव (General Secretary) शाईक सलाउद्दीन यांनी श्रीकांतबाबत सोशल मीडियावर लिहिल्यावर हा प्रकार उजेडात आला. सोशल मीडियावर आता श्रीकांतची कहाणी व्हायरल झाली असून उबरच्या अशा वागणुकीबद्दल नेटिझन्सकडून नाराजी व्यक्त होत आहे. 

बोंबला! तोंड लपवून यूट्यूबवर कुकिंग व्हिडीओ टाकत होता ड्रग माफिया, एक चूक पडली महागात!

उबर इंडिया कंपनीनं या प्रकरणी आपली बाजू स्पष्ट केली आहे. या ड्रायव्हरनं सिस्टीममध्ये लॉग इन होत नसल्याबद्दल उबर सेवा केंद्रात येऊन तक्रार दिली होती. त्यावेळी त्यानं अनेकदा लॉग-इन करण्याचा प्रयत्न केल्यानं सुरक्षा निकषांनुसार सिस्टीमनं त्याचे रजिस्ट्रेशन नाकारलं, असं कंपनीनं म्हटलं आहे.

कार लावून किराण्यात सामान आणायला गेला; अर्धवट उघड्या खिडकीतून १५०० मधमाश्या आत शिरल्या; अन् मग...

विशिष्ट माणसाच्या चेहऱ्यात होणारे नैसर्गिक बदल ओळखण्याची क्षमता या फेशियल रिक्ग्नेशन टूलमध्ये असते. त्यामुळं एखाद्या ड्रायव्हरनं केस कापले किंवा वाढवले तर ते ओळखलं जातं. याशिवाय चालकांना तांत्रिक कारणामुळे लॉग इन करण्यात अडचण येत असेल तर जवळच्या उबर सेवा केंद्रात जाऊन ते आपली अडचण दूर करू शकतात, असंही यावेळी कंपनीकडून सांगण्यात आलं. 

Web Title: Uber driver lost his job because of baldness read the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.