कुत्र्यांवर प्रेम करणारे जेवढे लोक आहेत तितकेच त्यांची भीती वाटणारीही लोकं आहेत. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, एखाद्या पाळलेल्या कुत्र्याला मारलं किंवा हाकललं तर त्या कुत्र्याचे मालकही संतापतात. पण एका महिले तर कहरच केलाय. झालं असं की, ऑकलॅंडमधील एक महिला सकाळी जॉगिंग करायला गेली होती. पण तिला जराही कल्पना नव्हती की, कुत्र्यापासून बचाव करता करता ती कुत्र्याच्या मालकीनीची शिकार होईल.
मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा ही महिला जॉगिंग करण्यासाठी गेली तेव्हा एका रागिट कुत्र्याने तिच्यावर अचानक हल्ला केला. तर बचाव करण्यासाठी महिलेने कुत्र्यावर पेपर स्प्रेचा वापर केला. अशातच त्या कुत्र्याच्या मालकीनीने महिलेवर हल्ला करत तिच्या हाताला चावा घेतला. यात महिला चांगलीच जखमी झाली.
द इस्ट बे रीजनल पार्कच्या जिल्हा पोलीस विभागाने जाहीर केलेल्या माहितीत सांगितले की, ही महिला जेव्हा जॉगिंग करत होती, तेव्हा एका कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. या कुत्र्याच्या मालकीनीने त्या महिलेला मदत करायची सोडून तिच्यावरच हल्ला. कुत्र्याच्या मालकीनीचं वय १९ वर्षे असून Alma Cadwalader असं तिचं नाव आहे. या मुली विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या ती तुरुंगात आहे.