खाली छप्पर, वरती चाके; अमेरिकेच्या रस्त्यावर धावते उलटी कार; 'VIDEO'ची होतेय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 01:22 PM2024-04-30T13:22:52+5:302024-04-30T13:24:37+5:30
सध्या सोशल मीडियावर एका विशिष्ट पद्धतीने डिझाईन केलेल्या गाडीचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. तुम्ही सुद्धा पाहा, ही अनोखी गाडी.
Social Viral : जगाच्या पाठीवर कुठं काय चाललंय याची माहिती देणारं एक प्रभावी माध्यम म्हणून सोशल मीडियाकडे पाहिलं जातं. त्यावर कधी काय पाहायला मिळेल याचा काही नेम नाही. आपल्या देशात जुगाडू लोकांची काही कमतरता नाही. निरनिराळे प्रयोग करत हे लोक असे काही जुगाड करून ठेवतात की ते पाहून कोणालाही धक्का बसेल.
अलिकडे सोशल मीडियावर एका गाडीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. तुम्ही बाईक आणि कारमध्ये विविध प्रकारचे मॉडिफीकेशन केलेले अनेकदा पाहिले असतील. पण अमेरिकेच्या रस्त्यांवर चालणाऱ्या या गाडीचं नवं डिझाईन पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. भररस्त्यात ट्रॅफिकमध्ये उलटी चालणारी ही गाडी पाहून अनेकजण चकित झाले.
व्हायरल व्हिडिओमध्ये अमेरिकेत एका सिग्नलवर काही गाड्या थांबलेल्या आहेत. त्यामध्ये दिसणारी एक गाडी लक्षवेधी ठरते. विशेष म्हणजे या गाडीला चक्क उलटी चाके बसवण्यात आली आहेत. उलट्या पद्धतीने रचना केलेली गाडी अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. या गाडीचं छप्पर वगळता संपूर्ण डिझाईन उलट्या पद्धतीने केल्याचं पाहायला मिळतंय. गाडीची चाके आभाळाच्या दिशेने तर तोंड आणि बोनेट जमिनीकडे आहे. हा जुगाड पाहून कार कंपन्यांना जणू झटकाच बसेल.
व्हायरल होणारा व्हिडिओ car_repair_usa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तर, जवळपास २,९३८४७ इतके लाईक्स या व्हिडिओला मिळालेत. ''याला AI टेक्नॉलॉजी म्हणतात... कोणत्याही अशक्य गोष्टीली शक्य करून दाखवतो'' अशी कमेंट एका यूजरने केली आहे.