ही गोष्ट खरीच आहे की, चाकांची मनुष्यांचं आयुष्यच बदलून टाकलं. जर चाकांचा आविष्कार झाला नसता तर कदाचित जग इतकं पुढे गेलंच नसतं. पण एका यूट्यूबरने कारच्या चाकांसोबत एक विचित्र प्रयोग केलाय. नुकताच त्याने या प्रयोगाचा व्हिडीओ त्याच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलाय. हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय. कारण यात या तरूणाने त्याच्या पिकअप ट्रकला गोलाकार ऐवजी चौकोनी चाक लावले आणि कार चालवली.
हा व्हिडीओ यूट्यूब चॅनल WhistlinDiesel वर ३० डिसेंबर २०१९ ला शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत तब्बल १९ लाखांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून ३३ हजारांपेक्षा अधिक लाइक्स याला मिळाले आहेत. या चॅनलवर असे कितीतरी व्हिडीओ आहेत ज्यात वेगवेगळे विचित्र प्रयोग तुम्हाला बघायला मिळतात.
मुळात हे सर्वांनाच माहीत आहे पण यातून हे बघायला मिळतं की, चाक हे गोलाकारच का असतात. चौकोनी चाक असले असते तर काय झालं असतं. एवढं नक्कीच की, चौकोनी चाके असलेली कार तुम्ही याआधी कधीही पाहिली नसेल, त्यामुळे हा व्हिडीओ तुमच्यासाठी एक वेगळा अनुभव नक्कीच ठरू शकतो.