कॅरेबियन देश डोमिनिकामधून एक विशाल सापाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा साप इतका मोठा आहे की, त्याला उचलण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. हा जगातला सर्वात मोठा साप मानला जात आहे. हा साप रेन फॉरेस्टमधून दिसून आला.
'द सन'च्या रिपोर्टनुसार, एका जिवंत साप जो कमीत कमी १० फूट लांब होता. त्याला क्रेनच्या मदतीने उचलण्यात आलं. क्रेनने उचलल्यावर साप वेगाने हालचाल करत होता. हे बघून आजूबाजूला उभे असलेले लोक आणि क्रेन चालवणाराही हैराण झाला. ज्या ठिकाणी हा साप आढळून आला तिथे खतरनाक बोआ कंस्ट्रिक्टर सापांची एक प्रजाती आढळते. या प्रजातीचे साप १३ फूट लांब असतात.
हल्ला करताना बोआ कंस्ट्रिक्टर साप आधी आपल्या शिकारीला चारही बाजूने वेढा देतात. मग शिकारीला मारण्याआधी दातांनी चावतात. अजून हे स्पष्ट झालं नाही की, व्हिडीओत दिसणारा साप कोणत्या प्रजातीचा आहे. दरम्यान डोमिनिकाला द नेचर आयलॅंडही म्हटलं जातं. इथे नेहमीच दुर्मीळ प्रकारचे जीव बघायला मिळतात.
रिपोर्टनुसार, या सापाला सर्वातआधी जंगलात काम करणाऱ्या लोकांनी पाहिलं. याला बघूनच ते हैराण झाले. नंतर त्याला उचलण्यासाठी क्रेन बोलवावी लागली. या घटनेचे अनेक फोटो समोर आले आहेत. ज्यात क्रेनने सापाला उचललेलं दिसत आहे.