अरे यारर्रर्रर्र ...! असं म्हणत न्हाव्याला धमकी देणारा हा चिमुरडा आहे तरी कोण?
By manali.bagul | Published: November 27, 2020 02:00 PM2020-11-27T14:00:40+5:302020-11-27T14:08:10+5:30
Trending Viral News in Marathi : हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमचं लहानपण नक्कीच आठवेल. केस कापण्याची जराही इच्छा नसताना या चिमुरड्याला केस कापावे लागले.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून केस कापायला जीवावर आलेल्या एका लहान मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या मुलाच्या निरागस हावभावांनी सोशल मीडिया युजर्सना खूप हसवलं. लहान मुलं केस कापायला अजिबात तयार नसतात. जरी घरच्यांनी जबरदस्ती कापायला बसवलं तरीही रडारड सुरू असते. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमचं लहानपण नक्कीच आठवेल. केस कापण्याची जराही इच्छा नसताना या चिमुरड्याला केस कापावे लागले.
My baby Anushrut,
— Anup (@Anup20992699) November 22, 2020
Every Parents is struggle pic.twitter.com/wN7B510ZwS
न्हावी जसजसे केस कापत आहे. तसतसा हा चिमुरडा 'अरे यार.... बाल मत काटो' असं म्हणत त्याला थांबवत आहे. हा न्हावी केस कापत असताना या चिमुरड्याला वेगवेगळे प्रश्न विचारत आहे. पण प्रश्नांची उत्तर दिल्यानंतरही हा चिमुरडा रागात असतो. त्यानंतर न्हाव्याला प्रेमळ धमकी देण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडिया युजर्स या मुलाच्या क्यूटनेसचे चाहते झाले आहेत. हा व्हिडीओ @Anup20992699 या ट्विटर युजरने २२ नोव्हेंबरला शेअर केला होता. या चिमुरडा आहे तरी कोण असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता.
बाबो! 'या' राजकुमारीचे बॉडीगार्डशी प्रेमसंबंध; अन् तोंड बंद ठेवायला दिले तब्बल १२ कोटी
या चिमुरड्याचे नाव अनुश्रृत आहे. अनुप पेटकर आणि श्रुती पेटकर यांचा हा मुलगा सध्या आपल्या आजोळी चंद्रपुरात आलेला आहे. त्याचे आई-वडील संगणक शिक्षण व्यवसायात नागपुरात कार्यरत आहेत. गोबऱ्या गालाच्या अनुश्रुतचे घरच्यांनी याआधीही अनेक व्हिडिओ तयार केलेत. मात्र चंद्रपुरात आल्यानंतर त्याचे केस कापताना त्याने दाखविलेला लटका राग आणि थेट हेअर ड्रेसरलाच मारण्याची दिलेली गोड धमकी यामुळे नेटकरी या बाळाच्या जणू प्रेमातच पडलेत.
१ नंबर, बॉस असावा तर असा! कर्मचार्यांना दिले कंपनीचे शेअर्स, सगळ्यांना करोडपती बनवलं ना राव
त्याचे हावभाव बघून आईने त्याचा व्हिडिओ घेण्याची सूचना केली. मात्र सोशल मीडियावर अपलोड केलेल्या व्हिडिओला असा उदंड प्रतिसाद मिळेल अशी कल्पनाही त्याने केली नव्हती. लोकांनी आपल्या घरातील बाळाच्या पहिल्या केस कापण्याच्या प्रसंगाशी हा व्हिडिओ जोडत त्याचा आनंद घेतल्याने हा व्हिडिओ चर्चेत आहे.
अनुश्रुतच्या या व्हिडिओ मागे असलेले हात आहेत ते चंद्रपुरातील त्याच्या घराजवळ असलेल्या हेअर ड्रेसर सुनील सविता यांचे. सुनील दोन पिढ्यांपासून पेटकर परिवाराचे हेयर ड्रेसिंग करत आहेत. अनुश्रुतचे केस कापायचे म्हणून सुनील आनंदात घरी पोहोचले. मात्र या ४ वर्षाच्या गोडुल्याच्या गोड धमक्या ऐकुन ते हसून हसून लोटपोट झाले.