बापरे! ट्रेनमध्ये सापडली लाल रंगाची बेवारस बॅग; अन् उघडून पाहताच दिसलं असं काही..... 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 01:32 PM2021-02-18T13:32:15+5:302021-02-18T13:35:07+5:30

Viral News of bag full of 14 crore found in train : आतापर्यंत कोणीही अशी बॅग हरवल्याची तक्रारही केलेली नाही. कोणत्याही स्टेशनवर बॅग हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. 

Viral News of Trolley bag full of rs 14 crore found in train | बापरे! ट्रेनमध्ये सापडली लाल रंगाची बेवारस बॅग; अन् उघडून पाहताच दिसलं असं काही..... 

बापरे! ट्रेनमध्ये सापडली लाल रंगाची बेवारस बॅग; अन् उघडून पाहताच दिसलं असं काही..... 

Next

भारतीय रेल्वेचे जाळे खूप मोठे आहे. तुम्हाला कल्पनाही असेल अनेकांच्या वस्तू या ठिकाणी हरवतात.  काही सामानातील गोष्टी लोकांना परत मिळतात. तर काही वस्तू लोकांच्या पायाखाली येतात आणि पुन्हा कधीच मिळत नाहीत. तुम्ही क्राईम पेट्रोल यांसारख्या शोजमध्ये पाहिलं असेल अनेकदा चुकीच्या कामासांठी अशा बॅग्सचा वापर केला जातो. बॅगेत एखाद्या मृत माणसाला किंवा पैसे भरून अज्ञात स्थळी , सार्वजनिक ठिकाणी ठेवलं जातं. जेणेकरून कोणालाही काही कळणार नाही. अशीच एक घटना दिल्लीतून समोर आली आहे.

दिल्लीहून बिहारला जात असलेल्या स्वातंत्र्य सेनानी (Swatantrta Sangram Senani Special Train) स्पेशल ट्रेनमध्ये पोलिसांना एक लाल रंगाची बॅग मिळाली. बॅग उघडल्यानंतर  जे दिसलं ते पाहून पोलिसही अवाक झाले. या बॅगेत जवळपास १.४ कोटी रूपये होते.

नोटांनी भरली होती बॅग

इंडिया टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार सोमवारी ही घटना समोर आली असून ट्रेन कानपूरला पोहोचली तेव्हा पँट्रीतील पोलिसांनी जीआरपींना माहिती दिली. बॅग संपूर्ण नोटांनी भरली होती. जोपर्यंत नोटांची मोजणी होत नाही. तोपर्यंत ही बाब गुप्त ठेवण्यात आली होती. मंगळवारी रात्री नोटांची मोजणी पूर्ण झाली. त्यानंतर इनकम टॅक्स (Income Tax) अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आली.Cute baby cow video: 'त्या'ने घरातच पाळली बुटकी गाय, दिवसाला देते ५ लीटर दूध, दिसायला आहे इतकी सुंदर की...

रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार  ही बॅग कोणाची आहे. याबाबत माहिती मिळालेली नाही. आतापर्यंत कोणीही अशी बॅग हरवल्याची तक्रारही केलेली नाही. कोणत्याही स्टेशनवर बॅग हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. स्वतंत्रता संग्राम सेनानी कोविड स्पेशल ट्रेन नवी दिल्लीवरून रात्री ९:१५ ला निघाली आणि २:५१ ला कानपूरला पोहोचली. पँट्रीकार कर्मचाऱ्यांनी रेल्वे अधिकाऱ्याना सुचना दिल्यानंतर ही बॅग ताब्यात घेण्यात आली. जीआरपी आणि टीआरपीची टीम त्या ठिकाणी पोहोचली होती. मोठ्या संख्येची रक्कम पाहून रेल्वे अधिकारीसुद्धा  चकीत झाले आहेत.  या फोटोतील हातांची संख्या आहे तरी किती? पाहताच क्षणी लोक गोंधळात पडले, बघा तुम्हाला जमतंय का

Web Title: Viral News of Trolley bag full of rs 14 crore found in train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.