भारतीय सैन्य हे संपूर्ण जगभरात एकात्मतेसाठी ओळखलं जातं. भारताच्या राष्ट्रध्वजात चार रंगांचा समावेश असून वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक भारतात गुण्यागोविंदानं राहतात. सध्या सोशल मीडियावर भारतीयांच्या एकात्मतेचं दर्शन घडवणारा फोटो तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो भारतीय सैन्यदलातील जावानांचा आहे. कौतुकाचा वर्षाव या फोटोवर केला जात आहे. कारण एकाच छताखाली दोन्ही धर्मीय आपले धार्मिक कार्य करत आहेत.
या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता. एका बाजूला सैनिक नमाज पठण करत आहे. तर उजव्या बाजूला असलेला सैनिक देव्हाऱ्याजवळ बसून पोथी वाचताना दिसून येत आहे. या फोटोला सोशल मीडिया युजर्सनी तुफान प्रतिसाद दिला आहे. भारतीय जवानांच्या या फोटोनं अनेकांची मनं जिंकली आहेत. AzzY या नावाच्या सोशल मीडिया युजरने इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे.
या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं आहे की, ''धर्म वेगवेगळा असला तरी विश्वास एकच आहे. माझ्या युनिटमध्ये १५ टक्के मुस्लिम बांधव आहेत. कोणतंही चांगले कार्य करण्याआधी पूजा आणि नमाजाचे पठनसुद्धा केलं जातं. एकाच छताखाली दोन्ही धर्मीय आपले कार्य करतात. या ठिकाणाला आम्ही सर्व धर्म स्थळ असं म्हणतो.'' समानतेची शिकवण देणारा हा फोटो आहे. या ठिकाणी सगळेचजण देशासाठी आहेत. लोकांनी या फोटोवर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. हे आपल्या देशाचं सौंदर्य असल्याचे सोशल मीडिया युजर्सनी म्हटलं आहे. युजर्सना हा फोटो खूप आवडला आहे.
हे पण वाचा
'किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है..... ' राहत इंदौरी यांच्या आयुष्याबद्दल ८ गोष्टी जाणून घ्या
अरे व्वा! २३ वर्षीय पठ्ठ्यानं रिक्षात तयार केलं बंगल्यापेक्षा भारी घर; पाहा आतून कसं दिसतं