बापरे! मगरीचा जीवघेणा हल्ला कॅमेरात कैद; तरुणाचा पाय जबड्यात धरून खेचलं पाण्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 03:18 PM2020-06-10T15:18:20+5:302020-06-10T15:26:19+5:30
अचानक एका मगरीने आपल्या जबड्याने अमितच्या पायाचा चावा घेतला आणि क्षणातंच पाण्याच्या आत खेचून नेलं.
मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये ही गंभीर घडना घडली आहे. अमित आणि गजेंद्र हे दोन मित्र डॅमच्या पाण्यात अंघोळ करण्याचा आनंद घेत होते. पाण्यात खेळत असताना स्वतःचा व्हिडीओ सुद्धा तयार करत होते. अचानक एका मगरीने आपल्या जबड्याने अमितच्या पायाचा चावा घेतला आणि क्षणातंच पाण्याच्या आत खेचून नेलं. त्यानंतर गजेंद्रने लाकडाने मगरीवर वार केला. त्यामुळे मगरीचे तोंड उघडले आणि त्या माणसाचा जीव वाचला. अंगावर शाहारे आणणारी ही घटना आहे.
या घटनेतील जखमी व्यक्तीने सांगितले की, ''मी आणि माझा मित्र सोमवारी घराशेजारच्या डॅममध्ये अंघोळ करत होतो. त्याचवेळी माझ्या पायाला अचानक वेदना जाणवल्या. काही कळायच्या आतंच मी पाण्यात बुडायला लागलो. नंतर मगरीने पायाचा चावा घेतल्याचं मला कळालं, जसा मगरीचा चावा सैल झाला तसा मी जमीनीच्या दिशेने धावलो.''
मगरीच्या तावडीतून तरूणाला वाचवणाऱ्या गजेंद्रने सांगितले की, मगरीने आपल्या जबड्यात अमितला पकडल्यानंतर मी किनाऱ्यावर पडलेल्या लाकडाचा वापर करून संपूर्ण बळ लावून मगरीला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मगरीची पकड सैल झाल्याने मी माझ्या मित्राचे प्राण वाचवू शकलो.
त्यानंतर जखमी तरूणाच्या पायातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत होता. गजेंद्रने अमितच्या पायाला कापडाने बांधले आणि जवळच्या रुग्णालयात घेऊन गेला. या हल्ल्यानंतर आता पाण्यात जाण्याची भीती वाटते. पुन्हा त्या ठिकाणी स्वतः जाणार नाही तसंच इतरांनाही जाऊ देणार नाही. असं त्या दोघांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षिकेचा 'देसी जुगाड'; पाहून तुम्हीही कराल तोंडभरून कौतुक!
एका कुत्र्याला पकडण्यासाठी चक्क १२ हजारांचं बक्षीस; लोकांमध्ये पसरली मोठी दहशत