Viral Video : ऑक्सिजन मास्क लावून ९५ वर्षांच्या आजींचा जबरदस्त डान्स; पाहा व्हायरल व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 02:49 PM2021-05-13T14:49:59+5:302021-05-13T15:08:04+5:30
Viral Video : त्याचे धैर्य अविश्वसनीय आहे. आज आपल्या सर्वांना याची गरज आहे. आपण पॉझिटिव्ह आहोत मग कोरोना निगिटेव्ह.
देशभरात कोरोना माहामारीमुळे लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला. रूग्णालयात रूग्णांची संख्या वाढत असताना मृतदेहांसाठी स्मशानभूमीत रांगाल लागल्या आहेत. तथापि, कोरोना ग्रस्त व्यक्तीवर कोणत्याना कोणत्या मार्गाने उपचार केले जात आहेत. कोरोना टाळण्यासाठी आणि त्यातून मुक्त होण्यासाठी आपण आपल्या मनानं बलवान आहात हे सर्वात महत्वाचे आहे, कारण आपले स्वतःचे धैर्य कोरोनाला हरवू शकते, जर आपण मनापासून कमकुवत झालात तर आजारापासून कोणीही आपल्याला बरे करू शकत नाही.
अशा परिस्थितीत काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये कोरोना ग्रस्त रूग्ण आणि डॉक्टर कोरोनाविरूद्ध लढण्याचे धाडस करीत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर कोरोना पीडित असलेल्या 95 वर्षीय वृद्ध महिलेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या दवाखान्याच्या पलंगावर तोंडावर ऑक्सिजन मास्क घालून नाचत आहेत.कोरोनामुळे एका व्यक्तीचा २ वेळा मृत्यू; तिरडीवर ठेवताच श्वास घेऊ लागला, मग त्याच एम्ब्यूलेंसनं रुग्णालय गाठलं
I thought, Dadi ji is doing "अपनी तो पाठशाला, मस्ती की पाठशाला" Step from #RangDeBasanti movie. 😅
— Dipanshu Kabra (@ipskabra) May 12, 2021
Her fighting spirit is just incredible. We all need this today.
"हम पॉजिटिव तो कोरोना नेगेटिव"
VC-SM. pic.twitter.com/OGMinYK5ZS
हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी शेअर केला आहे. व्हिडिओसह त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, त्याचे धैर्य अविश्वसनीय आहे. आज आपल्या सर्वांना याची गरज आहे. आपण पॉझिटिव्ह आहोत मग कोरोना निगिटेव्ह.
१० दिवस झाले ICU बेड मिळत नाही; तोंडावर ऑक्सिजन मास्क लावून एकटीच लढतेय तरूणी; समोर आला व्हिडीओ
व्हिडिओमध्ये, आपण पाहु शकता की आजी रुग्णालयाच्या पलंगावर बसल्या आहे आणि त्यांच्या तोंडावर ऑक्सिजन मास्क आहे. गरब्याचे गाणे वाजताना दिसून येत आहे. कोरोनाचं सगळं दुःख विसरून या आजी गरब्याचा आनंद घेत आहेत. आतापर्यंत हा व्हिडिओ 1 हजाराहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणीही नाचायला करण्यास सुरूवात करेल.