Video : 'फायरफॉल'चा हैराण करणारा व्हिडीओ व्हायरल, तीन दिवसात ४० लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 02:21 PM2020-01-22T14:21:38+5:302020-01-22T14:21:46+5:30
सोशल मीडियात नेहमीच अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे लोकांना आश्चर्यचकित करतात. एक असाच व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियात नेहमीच अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे लोकांना आश्चर्यचकित करतात. एक असाच व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अमेरिकेतील असून इथे एका डोंगरावरून 'आगीचे लोळ' खाली येताना दिसत आहेत. हा व्हिडीओ रविवारी ट्विटरवर शेअर करण्यात आला होता. अवघ्या तीन दिवसात तब्बल ४० लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, खरंच आगीचे लोळ डोंगराहून खाली येत आहे का? तर नाही. मुळात कॅलिफोर्नियाच्या योसेमिटी नॅशनल पार्कमधील 'हॉर्सटेल फॉल' आहे आणि या व्हिडीओत दिसणारा फॉल आगीचा नाही तर पाण्याचा आहे. पण सूर्याच्या किरणे या फॉलवर जेव्हा वॉटरफॉलवर पडतात तेव्हा पाणी आगीसारखं चमकतं. हे बघताना असं वाटतं की, जणून ज्वालामुखीतून लाव्हारस खाली पडतोय.
“Firefall” at Horsetail Fall in Yosemite National Park, California, looks like a scene from a fantasy movie. But, it is an ordinary waterfall, which is illuminated by the sunset, that gives it a fiery glow. pic.twitter.com/kP2aFmM6Cg
— Domenico Calia (@CaliaDomenico) January 19, 2020
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दरवर्षी फेब्रुवारीमध्ये हा वॉटरफॉल लाल आणि केशरी रंगाने चमकून उठतो. असं दोनदा होतो. याला योसेमिटी फायरफॉल असं म्हणतात. हा वॉटरफॉल २ हजार फूट खाली पडतो. हा धबधबा बघण्यासाठी देश-विदेशातून लोक येतात.