Flying dosa Video : लय भारी! मुंबई मॅनच्या 'Flying Dosa’ टेक्निकनं जगाला लावलं वेडं; पाहा जबरदस्त व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 03:38 PM2021-02-18T15:38:16+5:302021-02-18T15:47:18+5:30
Viral video of flying dosa : डोसा बनवण्याची अशी स्टाईल तुम्ही याआधी कधीच पाहिली नसेल.
मुंबई स्ट्रीट फूडसाठी (street food) किती प्रसिद्ध आहे, हे तुम्हाला माहीत आहेच. मुंबईला येऊन स्ट्रीट फूड नाही खाल्ले अशी एकही व्यक्ती मिळणार नाही. सध्या सोशल मीडियावर मुंबईच्या डोसा (Dosa Vendor) विक्रेत्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. दक्षिण भारतीय पदार्थ (South Indian Cuisine) वाढण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डोसा बनवण्याची अशी स्टाईल तुम्ही याआधी कधीच पाहिली नसेल.
हा आश्चर्यचकित करणारा व्हिडीओ मुंबईच्या (South Mumbai) के मंगलदास मार्केट (Mangaldas Market) मधील बालाजी डोसा शॉपमधील आहे. हा डोसा (Flying Dosa) उडत उडत प्लेटमध्ये येताना दिसून येत आहे. तुम्हीसुद्धा या व्हिडीओमधील जबरदस्त स्टंट पाहू शकता.
हा व्हिडिओ 'स्ट्रीट फूड रेसिपी' नावाच्या फेसबुक पेजने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक डोसा विक्रेता खास टेक्निकद्वारे डोसा बनवताना दिसत आहे. हा डोसा विक्रेता अशा प्रकारे उड्डाण करणारा डोसा हवेत बनवत आहे की डोसा थेट खाणाऱ्याच्या प्लेटवर पडेल. डोसा स्टंट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ही कला इतक्या स्पष्टतेने केली गेली आहे की तुम्हालाही पाहून आश्चर्य वाटेल. "Sorry Love, मी तुझं जेवण खाल्लं", Uber Eats च्या डिलिव्हरी बॉयने स्वत:च संपवली ऑर्डर अन्...
गेल्या आठवड्यात फेसबुकवर पोस्ट केल्यापासून, व्हिडिओने हजारो प्रभावित कमेंट्सह ८४.४ मिलियन व्हिव्हज आणि १.३ मिनियन लाईक्स मिळवले आहेत. ग्राहकांना सेवा देण्यासाठी डोसा हवेत फेकला जात आहे. ', इतर सोशल मीडियावर युजर्सनी म्हटले आहे की,' कलात्मकतेनं अन्नाची सेवा देत आहेत. ' या फोटोतील हातांची संख्या आहे तरी किती? पाहताच क्षणी लोक गोंधळात पडले, बघा तुम्हाला जमतंय का