१ नंबर! भारतीय महिलेनं शेणानं सजवली भिंत; भन्नाट व्हिडीओ व्हायरल होताच लोक म्हणाले.....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 07:38 PM2021-03-04T19:38:02+5:302021-03-04T19:43:31+5:30

Trending Viral Video in Marathi : अलिकडेच एका भारतीय महिलेचें टॅलेंट सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल झालेलं पाहायला मिळालं आहे. 

Viral video of an indian woman sticking cow dung cake on wall like a pro | १ नंबर! भारतीय महिलेनं शेणानं सजवली भिंत; भन्नाट व्हिडीओ व्हायरल होताच लोक म्हणाले.....

१ नंबर! भारतीय महिलेनं शेणानं सजवली भिंत; भन्नाट व्हिडीओ व्हायरल होताच लोक म्हणाले.....

Next

जगभरात भारतीयांप्रमाणे कला खूप कमी लोकांना अवगत असते.  जगभरात भारतीयांनी आपल्या टॅलेंटचा डंका वाजवला आहे. सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच याची उदाहरणं पाहायला मिळतात. अलिकडेच एका भारतीय महिलेचें टॅलेंट सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल झालेलं पाहायला मिळालं आहे. 

आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा (IPS Officer Dipanshu Kabra) यांनी ट्विटरवर (Twitter)  या महिलेचा व्हिडीओ शेअर केला आहे.  २४ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये भारतीय महिला (Indian Woman)  भिंतीवर शेणाच्या गोवऱ्या (Cow Dung Cake)  लावताना दिसून येत आहे. 

तेही अगदी सामान्य पद्धतीनं नाही तर वेगळं कौशल्य वापरून ही महिला भिंत सजवत आहे. या व्हिडीओत या महिलेचा निशाणा अचूक असल्याचंही तुम्हाला पाहायला मिळेल. या महिलेनं फेकलेल्या सगळ्याच शेणाच्या गोवऱ्या बरोबर योग्य ठिकाणी जाऊन चिकटत आहेत. बापरे! नदीवर म्हशी धूवून परतताना; अचानक मागून आली मगर, काही कळायच्या आतचं घडलं असं....

आतापर्यंत ३३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून मोठ्या संख्येने लोकांनी या महिलेचे कौतुक केले आहे. दिपांशू काबरा यांनी हा व्हिडीओ पोस्ट करताना  'एकदम परफेक्ट' असं कॅप्शन दिलं आहे. ५०० पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. तर काहींना या महिलेला बास्केट बॉल खेळण्याचा सल्ला दिला आहे. काय सांगता? तोंडावर मिशा उगवल्यामुळे या तरूणीला पुरूष समजताहेत लोक; गर्दीत जाताच होतं असं काही.....
 

Web Title: Viral video of an indian woman sticking cow dung cake on wall like a pro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.