सिग्नल लागताच एका ड्रायव्हरनं हॉर्न वाजवला; लगेच दुसऱ्यानं सेम टू सेम त्याचीच केली कॉपी ; पाहा व्हायरल व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 05:11 PM2021-03-12T17:11:10+5:302021-03-12T17:16:33+5:30
Trending Viral Video in Marathi : पहिल्यांदा चालकानं हॉर्न वाजवला त्यानंतर दुसऱ्या चालकानंही तशाच पद्धतीनं हॉर्न वाजवलेला पाहायला मिळेल. जणूकाही कोण जास्त चांगला हॉर्न वाजवतो अशी लढाईच सुरू आहे.
सोशल मीडियावर (Social Media) एका ट्रॅफिक सिग्नलचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. सहजा पाहिलं जातं की, ट्रॅफिक सिग्नलवर (Traffic Signal) वेळ घालवण्यासाठी लोक गाणी ऐकतात, तर काहीजण गप्पा मारत बसतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यात टाईपास करण्यासाठी दोन कार चालकांनी एक वेगळाच प्रकार केला आहे.
पहिल्यांदा एका कार चालकानं हॉर्न वाजवला त्यानंतर दुसऱ्या चालकानंही तशाच पद्धतीनं हॉर्न वाजवलेला पाहायला मिळेल. जणूकाही कोण जास्त चांगला हॉर्न वाजवतो अशी लढाईच सुरू आहे. कार चालकांना एकमेकांप्रमाणे एका तालात हॉर्न वाजवताना तुम्ही याआधीही अनेकदा पाहिलं असेल. आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा (IPS Officer Dipanshu Kabra) यांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे.
Men will be Men 😂😂 pic.twitter.com/Cqxt3hcqX0
— Dipanshu Kabra (@ipskabra) March 11, 2021
12 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये हे दिसून येते की रहदारी सिग्नलवर बरीच वाहने उभी असतात. ट्रक ते कार पर्यंत अनेक वाहनं उपस्थित आहेत. ते सर्व ग्रीन सिग्नलच्या प्रतीक्षेत आहेत. जेव्हा कार चालक उत्तम शैलीने हॉर्न वाजवतो तेव्हा पुढे असलेल्या कारचा ड्रायव्हर त्याची कॉपी करायला लागतो आणि हॉर्न वाजवू लागतो. बोंबला! केसातून पाणी गळेपर्यंत न्हाव्यानं स्प्रे मारला; अन् रागाच्या भरात पठ्ठ्यानं केलं असं काही......
आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी या व्हिडीओला कॅप्शन देताना 'Man Will Be Man' असं म्हटलं आहे. ११ मार्चला हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओला आतापर्यंत ३ हजारांपेक्षा लोकांनी पाहिले असून ४०० पेक्षा जास्त कमेंट्स या व्हिडीओला आल्या आहेत. सोशल मीडिया युजर्सनी या व्हिडीओवर गमतीदार कमेंट्सही केल्या आहेत. काय सांगता? २९ हजार लिटर दारू उंदरांनी संपवली; पोलिसांचा दावा वाचून तुम्हीही व्हाल अवाक्....