सोशल मीडियावर पाणी पिणाऱ्या माकडाचं होतयं कौतुक; का ते व्हिडीओत पाहा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 03:36 PM2019-08-06T15:36:57+5:302019-08-06T15:39:17+5:30
आपण अनेकदा ऐकतो की, माणसांपेक्षा प्राणी बरे, त्यांना बऱ्याच गोष्टी समजतात. याचीच प्रचिती एका व्हिडीओमधून येते. एका माकडाचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. खरं तर या व्हिडीओमध्ये एक माकड पाणी पिताना दिसत आहे.
आपण अनेकदा ऐकतो की, माणसांपेक्षा प्राणी बरे, त्यांना बऱ्याच गोष्टी समजतात. याचीच प्रचिती एका व्हिडीओमधून येते. एका माकडाचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. खरं तर या व्हिडीओमध्ये एक माकड पाणी पिताना दिसत आहे. आता तुम्ही म्हणाल की, यामध्ये व्हायरल होण्यासारखं काय आहे? या माकडाने केलेली करामत पाहून तुम्हीही या माकडाचं कौतुक कराल. कारण जे तुम्हा-आम्हाला जमत नाही ते या माकडाने केलेलं आहे.
खरं तर जवळपास सध्या महाराष्ट्रभर पाऊस पडत असला तरिही उन्हाळ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळामध्ये होरपळून निघाला. अनेक लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागत होतं. अशातच अनेक समाजसेवी संस्था पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी वर्षभर काम करत असतात. पण तरिही आपल्याला पाण्याचे महत्त्व काही पटलेलं नाही. पण या माकडाला काहीही माहीत नसून याने जे काम केलं आहे त्यामुळे खरचं त्याचं कौतुक करावं तेवढं कमीच.
माकडाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेक यूजर्स माकडाचा हा व्हिडीओ शेअर करत आहेत. या व्हिडीओमध्ये असलेलं तहानलेलं माकड पाणी पिण्यासाठी एका नळावर जातं. नळ उघडून आपल्याला हवं तेवढं पाणी पितं आणि पाणी पिऊन झाल्यावर नळ बंद करून तिथून निघून जातं. माकडाने आपल्या कृतीतून पाणी वाचवण्यासाठी दिलेल्या छोट्याशा संदेशाचं संपूर्ण सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
What a beautiful message for humans! pic.twitter.com/wTgK4b9uGF
— Dr. S.Y. Quraishi (@DrSYQuraishi) August 1, 2019
माकडाचा हा व्हायरल होणारा व्हिडीओ सर्वात आधी TikTok वर शेअर करण्यात आला होता. त्यानंतर ट्विटरवर माजी मुख्य निवडणूक आयुक्त डॉक्टर एसव्हाय कुरैशी यांनी शेअर केला. 11 सेकंदांचा हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी, 'मानवाला देण्यात आलेला सर्वात सुंदर मेसेज' असं कॅप्शन दिलं आहे.
त्यांनी हा व्हिडीओ गुरुवारी शेअर केला असून त्याला आतापर्यंत 5 लाख व्ह्यू मिळाले आहेत. अनेक लोकांनी कमेंट करत व्हिडीओमधील माकडाचं कौतुक केलं आहे. एका यूजरने कमेंट केली की, पाणी वाचवण्यासाठी एक उदाहरण म्हणून हा व्हिडीओ आहे.'