समुद्र किनारी मस्ती करण्याची सर्वांचीच इच्छा असते. पण अनेकदा काही मस्ती करत असताना काही चुकाही करतात. ज्या त्यांच्या आयुष्यात त्यांना महागात पडतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात काही लोक समुद्र किनारी मस्ती करताना दिसत आहेत. यातीलच काही लोक एका छोट्या विमानालाही किनाऱ्यावर उतरवतात आणि जेव्हा हे विमान उड्डाण घेण्याच्या तयारीत असतं तेव्हा ते घसरून समुद्रात जातं. नंतर काय होतं हे तुम्ही बघा.
हा व्हिडीओ नाजी अल तखीम नावाच्या एका ट्विटर यूजरने आपल्या अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिले की, न्यूझीलॅंडच्या मार्टिन्स बे समुद्र किनाऱ्यावर एका दिवसात दोनदा विमान क्रॅश झालं. हा व्हिडीओ स्थानिक न्यूज चॅनल ऑन डिमांडचा आहे. व्हिडीओत बघितलं जाऊ शकतं की, काही लोक समुद्र किनारी पोहोचले आहे. ते पाण्यात मस्ती करत आहे.
अशात एक छोटं विमान समुद्रातूनच उड्डाण घेतं. जसं विमान उड्डाण घेतं त्याचं संतुलन बिघडतं आणि विमान समुद्रात जातं. विमान वेगाने फिरतं आणि पाण्यात पलटी खातं. विमानाचं एक चाक वाळूत दबतो. विमान लहान असल्याने ते लोक खेचून बाहेर काढतात.
नंतर पायलट आणि कोपायलट विमानात झालेला बिघाड ठिक करून ते पुन्हा उडवण्याचा प्रयत्न करतात. पण दुसऱ्यांदाही हे विमान आधीसारखंच असंतुलित होऊन पाण्यात जातं. पलटी खातं. या घटनेत सुदैवाने कुणाला काही इजा झाली नाही.