रेल्वे प्रवास हा अनेकांच्या जीवनातील रोजचा भाग असतो. याच प्रवासादरम्यान कधीही असे प्रसंग पाहायला मिळतात. ज्यामुळे काळजाचा थरकाप उडतो. घाई-घाईने रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या कित्येक प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. यामध्ये दैव बलवत्तर म्हणून कित्येक जण रेल्वेच्या अपघातातून सुखरुप वाचलेही आहेत. तर काहींना लहानश्या चुकीमुळे आपला जीव गमावावा लागला आहे. अनेकदा पोलिस जवान किंवा उपस्थित प्रवाश्यांच्या प्रसंगावधानामुळे अनेकांना जीवदान मिळतं. अशीच एक घटना छत्तीसगड राज्यातील रायपूर रेल्वेस्थानकावर घडली आहे.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. छत्तीसगड येथील रायपूर रेल्वेस्थानकात एक रेल्वे वेगात निघाली होती. यावेळी एक माणूस रेल्वेच्या मागे अचानक पळू लागला. त्याच्याकडे दोन्ही हातांमध्ये सामान होते. त्याने लगेच धावत्या रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. पण हातात सामान असल्यामुळे त्याला वेगात धावणाऱ्या रेल्वेमध्ये चढता आले नाही. त्याचा पाय निसटला आणि तो रेल्वे प्लॅटफॉर्मवर पडला इतकंच नाही तर रेल्वेसोबत फरपटत जाऊ लागला. याला म्हणतात नशीब! फक्त १६३ रूपयांचं जेवण घेऊन ती घरी आली; अन् मिळाला १ कोटीचा मोती
संपूर्ण प्रकार रेल्वे पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने पाहिला. या पोलिसाने तत्काळ धाव घेत फरफटत जाणाऱ्या माणसाला पकडलं. त्यांनी रेल्वेच्या खाली जाण्यापासून वाचवलं. यावेळी रेल्वे पोलिसाचा एक कर्मचारी धावत गेला नसता तर कदाचित त्या माणसाचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाला असता. जीवाशी खेळत रेल्वेखाली जाऊन माणसाला वाचवणाऱ्या पोलिसाच्या जवानाचं नाव शिवम सिंह असं आहे. सोशल मीडियावर या जवानावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारीच! लॉटरी एजंट महिलेचा प्रमाणिकपणा; तिकिटाचे २०० रूपये देताच पठ्या जिंकला ६ कोटींचा जॅकपॉट