अमेरिकेतील इलिनॉयसमध्ये राहणाऱ्या एका वेट्रेससाठी २०२० ची चांगलीच धमाकेदार सुरूवात झाली आहे. तिला अमेरिकन गायक आणि गीतकार डॉनी वाह्यबर्गने वेट्रेसला २०२० डॉलर म्हणजेच १.४ लाख रूपये टिप दिली आहे. सीएनएनच्या एका रिपोर्ट्सनुसार, त्याने असं सोशल मीडियातील व्हायरल #2020tipchallenge मुळे केलं. मजेदार बाब ही आहे की, डॉनी ज्या हॉटेलमध्ये गेला होता, तिथे त्याचं बिल केवळ २३ डॉलर म्हणजेच १६५१ रूपये इतकंच झालं होतं.
दुसऱ्या एका रिपोर्ट्सनुसार, डॉनी त्याची पत्नी जेनीसोबत नविन वर्षाच्या १ जानेवारीला सेंट चार्ल्स येथील IHOP रेस्टॉरन्टमध्ये गेला होता. जेनीने ट्विटरवर रेस्टॉरन्टच्या बिलाचा फोटो शेअर केला. दुसरीकडे डॉनीने इतकी टिप दिली त्याबाबत वेट्रेस डेनिएल फ्रेंजोनी फारच आनंदी आहे.
डेनिएल घरं नसलेल्या लोकांच्या एका शेल्टरमध्ये राहते. ती ड्रग्स अॅडिक्ट होती आणि सध्या ट्रिटमेंट घेतीये. या पैशातून डेनिएलने सर्वातआधी स्वत:साठी घर घेतलं. तिने सांगितले की, 'माझ्यासारख्या लोकांसोबत असं नशीबानेच घडत असेल. मी आता या पैशांमधून माझं भविष्य चांगलं करणार आहे. मी माझ्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी या पैशांचा वापर करेल'.
#2020tipchallenge आणखीही अनेक लोकांनी स्वीकारलं. पण डॉनीने इतकी टिप देणं आवश्यक समजलं. त्याच्या या मोठ्या मनासाठी लोक त्याचं आणि त्याच्या पत्नीचं भरभरून कौतुक करत आहेत. २०१८ मध्येही असंच एक चॅलेन्च सोशल मीडियात गाजलं होतं. त्यात लोकांना जेवढं बिल तेवढी टिप देण्याची अपील करण्यात आली होती.