आपल्या घरातील किंवा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मनाला प्रचंड वेदना होतात. सध्या सोशल मीडियावर एका फॉरेस्ट रेंजरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी भावून झाले आहेत. या व्हिडीओमध्ये हत्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याला निरोप देण्याचे क्षण दिसून येत आहेत. वनविभागातील जवानाला हत्तीचा विरह न झाल्यानंतर त्याला अश्रू अनावर झाले आहेत. हत्तीच्या सोंडेला हात लावून हा जवान रडताना दिसून येत आहे.
आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ तामिळनाडूतील साडीवायल एलिफंट कॅम्प म्हणजेच मधूमलाई टायगर रिजर्व येथील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता हत्तीची सोंड लटकताना दिसून येत आहे. हत्तीला निरोप देताना जवानाला अश्रू अनावर झाले आहेत. यावरून लक्षात येतं की, वनविभागातील जवान आणि हत्ती यांच्या एक वेगळंच नातं असावं. बोंबला! घटस्फोटानंतर ५५ वर्षांची महिला २२ वर्षांच्या मुलाच्या मागे लागली, अन् आता म्हणते लग्न करणार ...
आतापर्यंत या व्हिडीओला ५२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं असून ३ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. उपचारादरम्यान या हत्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या व्हिडीओतून माणसं आणि प्राण्यांमधील घट्ट नात्याची अनुभूती मिळते. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स भावूक झाले आहेत. थरारक! JCB मध्ये अकडले २ विशालकाय अजगर; शेपटी खेचताच झालं असं काही......