हत्ती किती शक्तिशाली असतो हे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल किंवा तसा अंदाजही लावला असेल. पण जर तुम्हाला हत्तीच्या ताकदीचा अंदाज नसेल तर या व्हिडीओत बघू शकता. आयएफएस ऑफिसर सुशांत नंदाने हा व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात तुम्हाला दिसेल की, हत्तीमध्ये किती जोर असतो. हा व्हिडीओ केवळ ३८ सेकंदाचा असून इतक्या वेळातच हत्तीने एक पूर्ण झाड जमिनीवर पाडलं.
या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, हत्ती जोर लावतो आणि एक झाड पाडतो. इतकं मोठं झाड हा हत्ती फारच कमी वेळात पाडतो. हा एक आफ्रिकन हत्ती आहे.
हा व्हिडीओ पाहून ट्विटर यूजर्स हैराण झाले आहेत. पण अनेकांना प्रश्नही पडला आहे की, हत्ती असं काय करतोय? यावर एका यूजरने उत्तर दिलं की, हत्तीची वरपर्यंत सोंड पोहोचत नाही. त्यामुळे पाने खाण्यासाठी त्याने झाडच खाली पाडलं. जेणेकरून तो पाने सहजपणे खाऊ शकेल.