आईला पुन्हा भेटल्यावर असं खेळताना दिसलं हत्तीचं पिल्लू, व्हिडीओ पाहून व्हाल भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 02:27 PM2024-01-06T14:27:56+5:302024-01-06T14:28:50+5:30

(Lost Baby Elephant : बचाव अभियानानंतर हरवलेलं हत्तीचं पिल्लू आपल्या आईच्या कुशीत आनंदाने खेळताना आणि लाड करताना दिसत आहे.

When baby elephant reunite with mother hugs video makes people emotional | आईला पुन्हा भेटल्यावर असं खेळताना दिसलं हत्तीचं पिल्लू, व्हिडीओ पाहून व्हाल भावूक

आईला पुन्हा भेटल्यावर असं खेळताना दिसलं हत्तीचं पिल्लू, व्हिडीओ पाहून व्हाल भावूक

(Lost Baby Elephant : गेल्या आठवड्यात तामिळनाडू वन अधिकाऱ्यांनी पोलाचीच्या अनामलाई टायगर रिजर्व (Anamalai Tiger Reserve in Pollachi) मध्ये हत्तीच्या हरवलेल्या पिल्लाची त्याची आई आणि कळपासोबत भेट करून दिली. बचाव अभियानानंतर हरवलेलं हत्तीचं पिल्लू आपल्या आईच्या कुशीत आनंदाने खेळताना आणि लाड करताना दिसत आहे. हा व्हिडीओ फारच भावूक करणारा आहे.

फोटो व्हायरल झाल्यानंतर सुप्रिया साहू यांनी 4 जानेवारीला एक्सवर त्या क्षणाचा व्हिडीओ पोस्ट केला. ज्यात सांगण्यात आलं की, हत्तीच्या आईची कोमल मिठी, एका रेस्क्यू करण्यात आलेल्या पिल्लाला जे हवं होतं ते तसंच झालं. अनामलाई टायगर रिजर्वमधील वन अधिकारी, वन रेंजर, वन रक्षकांचं आणि अधिकाऱ्यांचं खूप अभिनंदन.

30 डिसेंबरला एक्सवर एका पोस्टमध्ये सुप्रिया साहू यांनी घटनेबाबत सांगत आणि टिमचं कौतुक करत हत्तीच्या पिल्लाच रेस्क्यू व्हिडिओ शेअर केला होता. वन अधिकाऱ्यांना हत्तीचं पिल्लू आपल्या आईला शोधताना दिसलं होतं. ड्रोन आणि अनुभवी वन पर्यवेक्षकांच्या मदतीने कळपाचा शोध घेण्यात आला आणि पिल्ल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आलं.

Web Title: When baby elephant reunite with mother hugs video makes people emotional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.