याला म्हणतात शेतकरी; ज्यांनी लाठ्या-काठ्यांनी मारलं, त्यांनाच भरवताहेत प्रसाद!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 01:44 PM2020-12-01T13:44:17+5:302020-12-01T13:56:18+5:30
Viral News in Marathi : दिल्लीतील आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी सुद्धा पोलिस कर्मचाऱ्यांना प्रसाद वाटत आहेत. यातून त्यांच्या माणुसकीचं दर्शन घडून येत आहे.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून लोकांना पोटभर अन्न मिळावं म्हणून रात्रंदिवस कष्ट घेतो. शेतकऱ्यांना सगळ्याच गोष्टी वाटून खाण्याची सवय असते. आता दिल्लीतील आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी सुद्धा पोलिस कर्मचाऱ्यांना प्रसाद वाटत आहेत. यातून त्यांच्या माणुसकीचं दर्शन घडून येत आहे. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यामधील संघर्ष हा आता भरपूर तीव्र झालेला आपल्याला दिसत आहे. त्यामुळेच हरियाणा आणि पंजाब सीमेवर शेतकरी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले होते. अशा स्थितीतही शेतकरी आपलं कर्तव्य करताना दिसून येत आहेत.
Delhi: Farmers protesting at Tikri border (Delhi-Haryana border) offer prayers and distribute 'prasad' among each other and security personnel on the occasion of #GuruNanakJayantipic.twitter.com/2eWZji4z6g
— ANI (@ANI) November 30, 2020
वृत्तसंस्था एएनआयने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. गुरूपर्वाच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी सगळ्यांना प्रसाद वाटताना कोणाशीही भेदभाव केलेला नाही. बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनाही शेतकऱ्यांनी प्रसाद वाटला आहे. शेतकरी कोणताही भेदभाव करत नाहीत. हे या फोटोमधून दिसून येत आहे. शेतकऱ्यांचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. आई ती आईच...! सापाच्या तोंडात सापडलेल्या उंदरांच्या पिल्लाला अखेर आईनं वाचवलं, पाहा व्हिडीओ
पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार तर हरियाणात भाजपचं सरकार त्यामुळे या आंदोलनावरुन जोरदार राजकारणही सुरु आहे. त्याची झलक पंजाब हरियाणाच्या सीमेवरच्या हरियाणा ब्रीजवरच पाहायला मिळाली होती. शेतकऱ्यांना सीमेवरच रोखण्यासाठी जोरदार बंदोबस्त करण्यात आला होता. पण बॅरिकेडस बाजूला सारत, ट्रॅक्टर रॅली करत शेतकरी पुढेच चालत राहिले. त्यामुळे काही काळ वातावरण तणावचंही बनलं. दिल्लीतल्या गुडगाव, फरिदाबाद, कर्नाल, नोएडा या सर्व सीमांवरच सरकारनं नाकेबंदी वाढवण्यात आली होती. वाह, नशिब चमकलं! भारताच्या 'या' गावात सापडलं हिऱ्याचं भांडार; अन् लोकांना कळताच.....