माणुसकीला सलाम! रस्त्यावर स्टॉल लावून भुकेलेल्यांना मोफत अन्न पुरवणारी 'ती' अन्नदाता

By Manali.bagul | Published: February 6, 2021 03:45 PM2021-02-06T15:45:26+5:302021-02-06T17:06:39+5:30

Trending Viral News in Marathi : जेव्हा एखादी भूकेलेली व्यक्ती त्या ठिकाणी येते आणि त्या व्यक्तीकडे पुरेसे पैसे नसतील तर त्यांना या स्टॉलवर मोफत पोटभर बिर्याणी मिळते.

Woman in coimbatore who runs biryani stall offers free biryani to hungry people | माणुसकीला सलाम! रस्त्यावर स्टॉल लावून भुकेलेल्यांना मोफत अन्न पुरवणारी 'ती' अन्नदाता

माणुसकीला सलाम! रस्त्यावर स्टॉल लावून भुकेलेल्यांना मोफत अन्न पुरवणारी 'ती' अन्नदाता

googlenewsNext

भुकेल्या माणसाला पोटभर अन्न पुरवण्यासारखं चांगलं काम दुसरं कोणतंही नाही. जेव्हाही कोणती उपाशी व्यक्ती दरवाज्यात येते तेव्हा तीला उपाशी पाठवू नये, असं म्हणतात. हेच काम केल्यामुळे एक महिला समाजासाठी आदर्शाचं एक मोठं उदाहरण ठरली आहे. स्वतःचा फायदा न पाहता इतरांसाठी काही करणारे खूप कमी लोक असतात.  तुमच्या विश्वास बसणार नाही पण ही महिला भुकेलेल्यांना मोफत अन्न पूरवते. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

तामिळनाडूच्या कोयंबटूरमची रहिवासी असलेली ही महिला आहे. तिनं आपल्या घरासमोर एक बिर्याणीचा स्टॉल लावला आहे. २० रुपये प्लेटप्रमाणे ही महिला बिर्याणी विकते. पण जेव्हा एखादी भूकेलेली व्यक्ती त्या ठिकाणी येते आणि त्या व्यक्तीकडे पुरेसे पैसे नसतील तर त्यांना या स्टॉलवर मोफत पोटभर बिर्याणी मिळते.

बोंबला! कोरोनाची लस घेताच भलत्याच भाषेत बोलू लागला; व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी म्हणाले...

वृत्तसंस्था एएनआयनं यासंबंधी ट्विट करत अधिक माहिती दिली आहे. माध्यमांशी बोलताना तिनं दिलेल्या माहितीनुसार, ''भूकेल्यांना जेवण पुरवणं हे माझं उद्दिष्ट आहे.  म्हणून मी जास्त पैसे न घेता २० रूपयांना बिर्याणी देते. पण ज्यांच्याकडे पैसे नाहीत असे लोक मोफत बिर्याणीचा डब्बा घेऊन जाऊ शकतात.''
कोयंबटूरच्या या महिलेने लोकांसाठी मानवतेचे एक आदर्श उदाहरण ठेवले आहे.

प्रत्येकाने त्यांना पाहताना त्यांच्याकडून शिकले पाहिजे आणि भुकेलेल्या आणि गरजू लोकांना मदत केली पाहिजे. सोशल मीडियावर या महिलेवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसून येत आहे. आतापर्यंत या फोटोंना ३ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून चारशेपेक्षा जास्त रिट्विट्स मिळाले आहेत. बरीच वर्ष सिंगल होता पठ्ठ्या; आता भाडं घेऊन बनतोय बॉयफ्रेंड, भानगड आहे तरी काय?

Web Title: Woman in coimbatore who runs biryani stall offers free biryani to hungry people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.