VIDEO : पुरात अडकलेल्या महिलेचा रेस्क्यू ऑफिसरने असा वाचवला जीव, थरारक व्हिडीओ...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 11:27 AM2021-06-05T11:27:21+5:302021-06-05T11:36:52+5:30
व्हिडीओत बघायला मिळतं की, एक बचाव अधिकारी पुराच्या पाण्यात आलेल्या या महिलेला कशाप्रकारे सुरक्षित बाहेर काढतो.
अमेरिकेच्या टेक्सासमध्ये पुरात वाहून गेलेल्या एका महिलेच्या रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल झाला आहे. २४ मे रोजी फोर्ट वर्थ भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यावर महिला पुरात अडकली होती. वाहत्या पाहण्यातून ती कार चालवत जाण्याचा प्रयत्न करत होती. पण पाण्याचा वेग इतका होता की, ती वाहून गेली. अशात ती कारमधून बाहेर पडली आणि एका झाडाची फांदी धरून तिने जीव वाचवला. व्हिडीओत बघायला मिळतं की, एक बचाव अधिकारी पुराच्या पाण्यात आलेल्या या महिलेला कशाप्रकारे सुरक्षित बाहेर काढतो.
मीडिया रिपोर्टनुसार, महिला आपल्या कारमधून बाहेर पली होती. पण नदीच्या मधोमध अडकली. अशात तिने एका झाडाची फांदी पकडून ठेवली. जेणेकरून ती वाहून जाणार नाही. त्यानंतर एक बचाव अधिकारी तिच्यापर्यंत दोरीच्या मदतीने पोहोचतो. त्यानंतर तो तिला लाइफ जॅकेट देतो आणि अधिकारी महिलेला स्वत:ला बांधून घेतो. त्यानंतर तिला किनाऱ्यावर आणतो.
पाण्याचा वेग इतका जास्त होता की, दोघांनाही आपलं संतुलन कायम ठेवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. मात्र, ते हळूहळू सुरक्षित बाहेर निघण्यात यशस्वी ठरले. अंगावर शहारे आणणारा हा व्हिडीओ १ मिनिटांचा असून हा व्हिडीओ स्थानिक रहिवाशी हॉवर्ड वॅनक्लेव नावाच्या व्यक्तीने रेकॉर्ड केला.
स्थानिक पोलीस विभागाचे मायकल ड्रिवडाहल म्हणाले की, 'आम्ही लोकांना पुराच्या पाण्यापासून दूर राहण्यास सांगितलं होतं. पाण्याचा वेग फार जास्त होता. पुराची स्थिती आणखी बिघडू शकते. आम्ही सुरक्षित राहण्यासाठी इथून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो'.