नादखुळा! ७ सीटर स्कॉर्पिओ गाडीनं केली शेताची नांगरणी; तरुणाचा भन्नाट जुगाड चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 12:42 PM2024-05-09T12:42:07+5:302024-05-09T12:46:32+5:30
सोशल मीडियावर कायमच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळत असतात.
Social Viral :सोशल मीडियावर कायमच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळत असतात. काही व्हिडिओ नेटकऱ्यांना खळखळू हसवतात तर काही व्हिडिओ बौद्धिक खुराक पुरवणारे असतात. असाच एका शेतकरी युवकाचा भन्नाट व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.
शेती बेभरवशाची असते असं म्हणतात. पण, बाजारपेठेचा अभ्यास हवामान विभागाचा योग्य सल्ला यातून शेती केली तर फायदेशीर ठरतेच. त्यातच आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकरी लाखोंची उलाढाल करतान दिसत आहेत. यामुळे वेळ आणि पैसाही वाचत आहे.
पूर्वी शेती पारंपरिक पद्धतीने केली जात होती. त्यासाठी बैल किंवा जनावरांच्या मदतीने चिखलणी होत होती. पण, अलिकडे चिखलणी करण्यासाठी यंत्रे आली आहेत. ट्रॅक्टर तसेच पॉवर टिलर व रोटावेटर यांच्या माध्यमातून चिखलणी करण्यात येते. पण या व्हायरल व्हिडिओमध्ये तरुणाने अशी काही शक्कल लढवली आहे, जे पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एका शेतामध्ये महिंद्रा कंपनीची कार चालताना दिसत आहे. मातीने रंगलेल्या कारमध्ये एक तरुण बसलेला आहे. पण मध्यातच तो कारमधून बाहेर पडतो. खरी गंमत म्हणजे, या स्कॉर्पिओ गाडीच्या पाठीमागे चक्क नांगर बसवण्यात आला आहे. हा नांगर सध्या विशेष लक्षवेधी ठरतोय. एका ७ सीटर गाडीचा असाही उपयोग होऊ शकतो. याचा अंदाजही कोणालाही आला नसेल. स्कॉर्पिओ गाडीच्या साहाय्याने शेती नांगरणाऱ्या या शेतकऱ्याची भन्नाट कल्पना नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे.
rahul_raosaheb नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तर यूजर्सनी या व्हायरल व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडल्याचं चित्र दिसून येत आहे.